पान:आरोग्यशास्त्र.pdf/३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याज्य पदार्थांची विल्हेवाट ३१ त्याज्य पदार्थ व विशेषत: मानवी मलमूत्र पुरतेपणीं रोजचे रोज गांवाबाहेर नेणें, ह्यावर वस्तीचें आरोग्य पुष्कळसें अवलंबून असतें. वरील व्यवस्था चोख केल्यास गांवाचें आरोग्य सुधारून मृत्यूचें प्रमाण कायमचें कमी होतें. हीं कामें करण्याच्या पद्धति पुढें दिल्या आहेत. ( १ ) स्कॅवेंजिंग सिस्टिम - सर्व शहरांतून उकिरडा, राख, धूळ, केर, टाकलेलें अन्न, रस्त्यावरील केर ह्रीं सांठवावयाचीं व नेण्याचीं कामें हातानें व वाहनानें केली जातात. ( २ ) कॉन्सर्वन्सी सिस्टिम - घरांतील सांडपाणी व धुण्याचे वगैरे पाणी मो-यांवाटे व बंद गटारांवाटे बाहेर नेलें जातें. त्याचप्रमाणें शेत- खान्यांतील मल व मूत्र हीं हस्तद्वारा किंवा यंत्रद्वारा वाहनांचे सहाय्यानें गांवाबाहेर नेली जातात. THE (३) वॉटर - कॅरेज सिस्टिम -- ह्या पद्धतीत घरांतील सांडपाणी व धुण्याचें वगैरे पाणी व मानवी मलमूत्र इत्यादि पदार्थ नळावाटे व बंद गटाराचे मार्गानें गांवाबाहेर एकाद्या स्थळीं नेऊन सोडतात .. केरकच-याची विल्हेवाट घरांतील केरांत सारवणाचा केर, माती, टाकून दिलेलें अन्न, राख, कोळसे, भाजीच्या काड्या व सालपटें, कागद व कापड ह्यांचे तुकडे इत्यादि पदार्थ येतात. प्राणिज व उद्भिज अन्न सडल्यानें दुर्गंध व अपाय फार होतो. हे पदार्थ होईल तितके लवकर, घराचे बाहेर सार्वजनिक कचरा-पेट्यांत टाकावे. त्यांपैकीं जाळतां येतील तितके आधीं घरांत जाळून टाकावे. कचऱ्याच्या पेट्या कल्हई केलेल्या लोखंडाच्या असाव्या च त्यावर नीट बसतीं झांकणें असावीं. म्हणजे आंत पावसाचें पाणी जात नाहीं व कचरा सडत नाहीं. पेट्यांतील कचरा व केर रोजचे- रोज काढून न्यावा. घरांतील केर रोजचे रोज बाहेर कचऱ्याचे पेट्यांत टाकावा. घराचे आवारांत उकिरडा सांठविल्याने प्रकृतीस अपाय होतो.