पान:आरोग्यशास्त्र.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रस्तावना

 हिंदुस्थानचा संबंध सुधारलेल्या राष्ट्रांशी आल्यामुळे त्याची उन्नति अनेक बाजूंनी होत आहे. नाना प्रकारच्या शिक्षणसंस्था ह्या देशांत स्थापन झाल्या आहेत; म्हणून अनेक प्रकारच्या ऐहिक विद्यांत हिंदी लोकांची गति होत चालली आहे. परंतु ही सुधारणा मुंगीच्या पायाने होत आहे. कारण वरील संस्थांत दुय्यम प्रतीचे व उच्च शिक्षण आंग्ल भाषेतून दिले जाते. शिक्षणाचा प्रसार अधिक वेगाने व सर्व वर्गात होण्यास तें मातृभाषेतून दिले पाहिजे. जेथें साक्षर लोकांची संख्या शेकडा सहा आहे व आंग्ल भाषेचे दुय्यम प्रतीचे शिक्षण संपादन केलेले लोक शेकडा एक देखील नाहीत तेथें आंग्ल भाषेत लिहिलेल्या विषयांचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला तर तो फारच थोडा होईल हे उघड आहे. ह्याकरिता प्रत्येक विषयावर मातृभाषेत ग्रंथ तयार झाले पाहिजेत.
 सातारा येथील गोखले वैद्यक शाळेत' शारीर (अॅनॅटमी), इंद्रियविज्ञानशास्त्र (फिजिऑलजी ), वैद्यक ( मेडिसिन ), व आरोग्य. शास्त्र ( हैजीन ) हे विषय मराठी भाषेतून पुष्कळ वर्षे मी शिकवीत असे, म्हणून वरील प्रत्येक विषयावर आज छापण्यासारखे ग्रंथ मी लिहून तयार केले आहेत. त्यांपैकीच प्रस्तुतचा आरोग्यशास्त्रावरील ग्रंथ हा एक आहे.
 रोग झाल्यावर उपाय करण्यापेक्षां तो नच होऊ देणे उत्तम. रोगांवर उपचार करण्यास द्रव्याची जरूरी असते. पण आरोग्यरक्षणास धन लागत नाही, परंतु त्याला आरोग्यशास्त्राच्या मूलतत्त्वांची माहिती अवश्य आहे. त्या माहितीचा फैलाव आपल्या देशांत होईल तितका थोडा