पान:आरोग्यशास्त्र.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याज्य पदार्थाची विल्हेवाट ३३ प्राणिज व उद्भिज असें भिन्नभिन्न अन्न भक्षण करणाऱ्या युरो- पियन प्रौढ मनुष्याला दररोज सुमारें १० तोळे मळ व ३ रत्तल मूत्र होतें. प्रौढ हिंदूला रोज सुमारे २० तोळे मळ होतो. बारा वर्षांच्या मुलास वरच्याचे निम्याहून कांहीं कमी मळ होतो. लहान-थोर, बायका - पुरुष अशी मिश्र हिंदी वस्ती घेतल्यास रोज दर डोईमार्गे १५ तोळे मळ व २॥ रत्तल मूत्र होतें. ताज्या मळांत शेकडा २३.४ घन भाग असतो. ताज्या मूत्रांत ४ २ भाग असतो. मूत्रांतील ह्या घन भागापैकीं ५४ भाग युरिआ असतो; हिंदुस्थानांत गुदशुद्धि पाण्याने करतात. ह्या काम दर वेळी सुमारे ३० औंस पाणी लागते. मिश्र वस्तीत दर माणशी मूत्रावाटे १८९ ग्रेन नैट्रोजन रोज जातो, व मळावाटे सुमारें ५० ग्रेन जातो. म्हणजे एकंदर सुमारें २४० ग्रेन नैट्रोजन शरीराचे बाहेर जातो. मलमूत्रांतील दुसरे महत्त्वाचे घटक फॉस्फेट्स व पोटॅश हे आहेत. समान वजनाचे मळांत मूत्रापेक्षां मह- वाचे पदार्थ अधिक असतात. त्याचे प्रमाण १०:६ हें आहे. परंतु उत्सर्जित मूत्राचें वजन मळाच्या सुमारें ६ ॥ पट असतें. म्हणून एकंदर मूत्रांतून जाणारे महत्त्वाचे पदार्थ मळांतल्यापेक्षां चौपट असतात. दर माणशीं मळमूत्राच्या खताची किंमत अदमासें चार रुपये भरेल. ही सर्व किंमत पदरांत पडत नाहीं. कारण शेतांतील निरुपयोगी अशा पदा- थांची मिसळ न होतां फक्त मळमूत्र जमवितां येत नाहीं. शेतखाने, तारदखाने, इत्यादींमध्यें मळसूत्र कुजण्याची क्रिया वेगाने चालते. व सडक्या वाफा, सल्फ्युरेटेड हैड्रोजन, अमोनियम सल्फाईड इत्यादि दुर्गंध वायु उत्पन्न होतात. मूत्रांतील युरिआचें ( Urea ) पृथ:करण होर्ते व अमोनिया ( Amonium Carbonate) ( Water ) उत्पन्न होतो. हा बदल इतका जलद होतो कीं, सूअर्सची व्यवस्था उत्तम असेल त्या गांवांत देखील मलमूत्र शेवटच्या स्थानी पोचण्यापूर्वी बहुधा सर्व युरि- याचा अमोनिआ होत असेल. ३