पान:आरोग्यशास्त्र.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ आरोग्यशास्त्र

कॉन्सर्व्हन्सी सिस्टिम लागू पडते अशी मलविसर्जन करण्याचे स्थानासंबंधी कांहीं माहिती खाली दिली आहे.

( १ ) प्रिवी अथवा मिडन सिस्टिम - खेड्यांतून गांवाबाहेर व रात्री अपरात्रीं घराचे आसपास मलविसर्जन करण्याची वहिवाट असते. ( २ ) शेतखाने व तारदखाने ह्यांत फारसा फरक नाहीं. सार्वजनिक शेतखान्यांना तारदखाने म्हणतात. शेतखान्यांत मळमूत्र निरनिराळ्या चलपात्रांत पडण्याची व्यवस्था असते. शेतखान्यांतील मळ व मूत्र 'रोज एकदा तरी काढण्याची व्यवस्था झाली पाहिजे. तारदखाने राहत्या इमारतीपासून निदान २५ फूट दूर असावेत. तारद - खान्याच्या सफाईचें व मुबलक पाण्याने धुण्याचें काम निदान दोनदां झालें. पाहिजे. (३) पेंवाचे शेतखान्यांची चाल असते. घरालगत अगर शेजारच्या परड्यांत सुमारे ५/६ हात खोल खळगे खणून त्यांचें वरील तोंड मलविसर्जन करण्यास योग्य होईल अशा रीतीनें बांधून काढतात. हीं पेंवें भरत आल्यावर माती वगैरेनें बुजवितात व नवीन बांधतात. आरोग्यदृष्ट्या ही पद्धत ग आहे. ह्यानें अपायकारक व दुर्गंध वायु पसरतात व आसपासच्या विहिरींचें पाणी बिघडते. पर्जन्य- कालौं भौमजलाची सपाटी उंच आल्यावर पाणी विशेषकरून बिघ- तें. ( ४ ) दी कमोड सिस्टम -- हिंदुस्थानांतील इंग्रज लोकांत ही पद्धत फार प्रिय आहे. ह्यामध्यें लोखंडाच्या अथवा लाकडाच्या चौक- टींत चिनीमातीचें अथवा एनॅमेलचें खोल भांडे ठेवलेलें असतें. चौक- टीचे टोक हीच बैठक होय. मलभाजन स्वच्छ ठेवण्याची जर काळजी घेतली तर ह्या व्यवस्थेंत कांहीं न्यून नाहीं. शहरांतील खाजगी शेतखान्यांतून मल निराळ्या पात्रांत व मूत्र निराळ्या पात्रांत पडेल अशी व्यवस्था असावी पण तशी ती नसते. मळाची सफाई वक्तशीर रोजच्या रोज घडत नाहीं. मूत्र व सांपडणी ह्रीं