पान:आरोग्यशास्त्र.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याज्य पदार्थांची विल्हेवाट ३५ काढून नेण्याची तर फारच हलगरज होते. तीं तेथें मुरतात व मलपात्रें खराब असतात व तें ठेवण्याचें स्थान पडिक असतें. ह्यामुळे मलाचा भाग मूत्रांत व सांडपाण्यांत मिसळतो. तेथें कुजण्याच्या क्रिया चालूं राहतात. ह्यामुळे आसपासची हवा दूषित होते व जवळच्या विहिरींत त्याचा झिरपा जात राहतो. म्हणून मनुष्याच्या प्रकृति कमजोर व रोगो- न्मुख होतात. शेतखान्याची रचना साधी असावी. आसपासच्या जमिनीपेक्षां त्याचें जोतें निदान दोन हात उंच असावें. बैठकीच्या खालील सर्व बांधकाम घडीव दगडाचें व कोनविरहित चुनेगच्ची व सिमेंटनें मढविलेले असावें. . मलपात्र ठेवण्याची जागा उतरती व भोवतालच्या जागेपेक्षां निदान ६ इंच उंच असावी. मलविसर्जनानंतर मलपात्रांत दर वेळीं राख घालावी व त्यांत शक्य तितकें कमी पाणी सांडावें. 'मूत्र नळीवाटे व मोरीचे द्वारां नेऊन दूर बांधलेल्या कोंडीत सोडावें. ह्या कोंडीत मल न मिसळेल अशी व्यवस्था करावी. वॉटर कॅरेज सिस्टिम : - लहान गांवांत व खेड्यांत घरांतील सांड- पाण्याची विल्हेवाट लावणें हें अवघड काम आहे. कारण शेतखान्यांतील मूत्र-सांडपाण्याइतकें खराब होते. ते काढून गांवाबाहेर लावण्यास - मोठे मोठे नळ व बांधीव गटारे लागतात. याला फार खर्च येतो व तें एकत्र सोडून देण्यास योग्य स्थल बहुधा आटोक्याचे बाहेर असतें. सामान्यतः खेड्यांतील सांडपाणी कच्च्या बांधलेल्या गटारांतून नेतात. तें जमिनींत राहते, त्यामुळे तेथील हवा व जल बिघडतात. पावसाळ्यांत त्या पाण्याची डबकीं सांठतात म्हणून हीं गटारें पक्की करावी. त्यांना ढाळ असावा. ड्रेनेज असलेल्या शहरांतील मलमूत्रमिश्रित घाण पाणी शेतांत पाटाने सोडावें व खेड्यांतील घराचें सांडपाणी योग्य पात्रांत धरून आपआपल्या शेतांत नेऊन ओतावें.