पान:आरोग्यशास्त्र.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३६ आरोग्यशास्त्र सूरज म्हणजे मलमूत्र मिश्रित घाणपाणी व तें हालविणें. मानवी मलमूत्र आणि तत्रेले, गोठे, कारखाने इत्यादींमधील सांडपाण्याला सूरज ' म्हणतात. मलमूत्र न मिसळलेल्या सांडपाण्यास म्हणतात. < सूएज काढून नेणें ह्याच्या दोन तन्हा आहेत :- -- C सलेज १. कॉन्सर्व्हन्सी सिस्टिम - हिचें वर्णन पूर्वी आले आहे. २. वॉटर कॅरेज सिस्टिम — ह्या प्रकारांत मलमूत्रमिश्रित इतर सांड- पाणी ह्याला चांगले पाण्याचे प्रवाहानें जनवस्तीपासून दूर नेण्यांत येते. हें काम फार खर्चाचें आहे व ह्या पद्धतीचा उपयोग करण्यास पाण्याचा मुबलक पुरवठा लागत असल्यामुळे प्रत्येक शहरांत ही सुरू करतां येत नाहीं. पुढे अनेक वर्णांकडे दृष्टी फेकल्यास ही पद्धत एकंदरीनें कमी खर्चाची आहे. उत्तम तऱ्हेची स्वच्छता राहून सफाईचें काम फार जलदी होतें म्हणून ही आरोग्यदृष्ट्या हितावह आहे. मोठ्या शहरांत ही अवश्य अमलांत आणावी. घराचे सांडपाणी ह्यांत पृथःकरण होण्याजोगे सेंद्रीय व स्नेहयुक्त पदार्थ ज्यास्त विपुल असतात. जसें, स्वयंपाकघरांतून बाहेर पडणारे सांडपाणी, मूत्र, साबण, कपड्याची आणि त्वचेची घाण असलेलें स्नानगृहांतील धुण्याचें पाणी, ह्यांनी सांडपाणी बनलेलें असतें. ह्या पाण्यांत द्रव, उत्सर्जित द्रव्यें, तत्रेले, गोठे ह्यांच्या मोऱ्यांतील सांडपाणी हीं सर्व मिसळतात. तबेल्यां- तल्या मोऱ्यांत मूत्राचें प्रमाण फार असतें. एका घोड्याचें मूत्र मनुष्याच्या मूत्राचे पंधरापट असतें. असल्या गटारांतील द्रव, पाण्याचे तारदखाने असलेल्या शहरांतील ज्या गटारांत मानवी मलमूत्र असतें त्यांतील पाण्याइतकें जवळजवळ घाण असतें. शेतीच्या कामी पाण्याचे तारदखान्यांचे गटारांतील १० टन