पान:आरोग्यशास्त्र.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૩૮ आरोग्यशास्त्र पाणी राहण्याची व्यवस्था असते. हे पात्र अनेक बैठकींचे खालीं असून पुष्कळ लोकांना एकाच वेळी वापरतां येतें. आंत कांहीं मलमूत्र जमल्या- बरोबर पाण्याचे जोरानें व मोठ्या प्रवाहानें दूर लोटली जातात. ही व्यवस्था स्वस्त पडते व क्वचितच बिघडते. (२) पाण्याचे शेतखान्याचे नळ :- हे नळ मलमूत्रादि वाहून नेणाऱ्या सूअरला जोडलेले असतात. ( ३ ) घराचे बाहेर जाणारे नळ, ह्या नळांवाटे पाण्याचें शेत- खान्यांतील, घर, गोठे, व आंगण ह्यांतील अन्य प्रकारचें पाणी सूअरला जाऊन मिळतें. (४) ट्रॅप :- ह्यांमुळे सूअरमधील दुर्गंध वायु घरांत शिरत नाहीं. (५) लोखंडी तळचे सोट व नळ ह्यांच नमुन्याचे तारदखाने कमोड सिस्टिमपेक्षां बरे. ( ६ ) जेथें पाणी मुबलक असेल अशा ठिकाणीं मलमूत्र हें चुना- कंक्रीटचे मध्यें कोठें कोठें पोकळ काम ठेवून त्या ढिगांत सोडतात. कंक्रीटचे खालीं काळ्या मुरूमचे फिल्टरमधून बागेचे उपयोगास स्वच्छ पाणी बाहेर येतें. मलमूत्राचे आंत किडे बनून ते किडे मलमूत्राची घाण नाहींशी करतात. पाणी मुबलक असल्यास ही क्रिया सतत चालते. मैल्याचे उपयोगः-मैला, मूत्र व केरकचरा, राख इत्यादि शहरा- पासून दूर ज्या दिशेनें वारा शहरांत येत नाहीं अशा दिशेस मुरमाड जागीं नेऊन त्याचें मिश्रण प्रमाणांत करून उथळ खड्डयांतून मुरूं देतात नंतर त्यांचे ब्रास करून विकतात. उसाचे लागवडीस त्याचा उपयोग होतो. ह्या ब्रासाची किंमतही बरीच येते साधारणपणे पन्नास हजार वरतीचे शहरास २०,००० रुपयांपर्यंत उत्पन्न आसपास चांगली शेतकी असल्यास सहज येतें. ही दरसाल उत्पन्नाची बाब आहे.