पान:आरोग्यशास्त्र.pdf/४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याज्य पदार्थांची विल्हेवाट ३९ सूअर्स घाण पाणी व पात्रसाचें पाणी गुरुत्वाकर्षणानें वाहून नेणाऱ्या जमिनीचे पोटांतून जाणाऱ्या मोठ्या मार्गांना सूअर्स म्हणतात. कधीं कधीं वरील दोन प्रकारचें पाणी भिन्न मार्गांनीं जातें. ह्यांतील पाणी नदीत किंवा समुद्रांत सोडतात. ओहोटीचे वेळीं देखील सूअरमधलें द्रव्य पाण्याचें पृष्ठभागाचें खालीं सोडलेलें असतें. सुअरमध्यें उलट बाहेरील भरती वगैरेचें पाणी शिरूं नये म्हणून सूअरचे तोंडावर व्हाल्व्ह नामक पडदा असतो. न्युमॅटिक सूअरमध्यें सूएज कांहीं उंचीवर चढवतात. किंवा घनीकृत हवेनें तें पुढे लोटतात. सूअरमधील हवा: - साध्या पुष्कळ पाण्यानें सूअरमधील पाणी मंद झालें व तें पुढें लवकर बाहेर वाहात गेलें म्हणजे घन पदार्थ मार्गाला चिकटून राहात नाहीत व दुर्गंध फार सुटत नहीं. सूअरमधील हवा फार अशुद्ध होऊ नये म्हणून शंभर शंभर याङवर सूअरपासून पोकळ नळ्या रस्त्याचे वर भागापर्यंत नेतात. ह्या नळ्यांत दगड शिरूं नयेत म्हणून त्यांचे तोंडावर जाळी लावलेली असते. सूरजमधल्या पाण्याची विल्हेवाट सूएजमधल्या पाण्याचा शेवट लावणें हा आरोग्याचे अधिकाऱ्यांस फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण ह्याची वाट नीटपणें लावल्यास लोकांचें आरोग्य रक्षण होईल. पाश्चिमात्य देशांत ह्या कामाची काळजी वाटत नाहीं. कारण प्रत्येक गांवांत व खेड्यांत गाळलेल्या पाण्याचा स्वतंत्र मोठा पुरवठा असतो. परंतु हिंदुस्थानांत बहुतेक सर्व जागीं पाण्याचा तुटवडा असतो. म्हणून सबंध गांवाचें घाण पाणी नदीमध्ये सोडणें गांवाचे आरोग्यास विघातक होईल.