पान:आरोग्यशास्त्र.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० आरोग्यशास्त्र सूएजचें पाणी जमिनींत सोडून देणें: - जमिनीचे पृष्ठभागी असणारे असंख्य जंतु सुएजमध्यें कुजण्याची क्रिया उत्पन्न करून त्याचें रूपांतर करतात. सूरज जसाच्या तसाच किंवा त्यावर कांहीं क्रिया करून जमिनीवर सोडतात. ज्यावर हा सोडतात ती जमीन उतरती व सछिद्र असावी. प्रकरण ३ रें वातावरण व वाताभिसरण पृथ्वीभोवती असलेल्या वाताच्या आवरणाच्या उंचीचा नीटसा शोध लागला नाहीं. ती सुमारें एकोणीस मैल आहे. आरोग्यास स्वच्छ हवेची पूर्णपणें आवश्यकता असते व इतर अवश्य गोष्टींबरोबर शुद्ध हवेचा भरपूर पुरवठा असला तर पुरतें आरोग्य राहील. आरोग्याचें व रोगाचे प्रमाण हवेच्या शुद्धाशुद्धतेवर अवलंबून असतें. आरोग्याचे हानीला विशेषतः अशुद्ध हवा कारणीभूत होते. हवा रंगहीन, रुचिरहित व गंधविहीन आहे. हवेला वजन आहे. एकाद्या फुग्यांतील हवा काढून तो वजन केला व पुन्हा त्यांत हवा घालून त्याचें वजन केलें तर त्या दोन वजनांमध्यें जें अंतर पडतें तें हवेचें वजन समजावें. निरनिराळ्या प्रमाणांत केलेल्या दाबाच्या मानाच्या विषम प्रमाणांत कोणत्याही वायूच्या आकारमानाचें प्रमाण राहातें. दाब फार असल्यास वायूचें आकारमान कमी होतें व दाब कमी अस- ल्यास आकारमान वाढतें ( बॉईल्सचा नियम ). वायूला उष्णता लाव- ल्यानें विशेष नियमानुसार ( चार्लसचा नियम ) त्याचे आकारमान वाढते. वायूच्या घनत्वाच्या वर्गमूळाच्या विषम प्रमाणांत ते एकमेकांत मिसळतात.