पान:आरोग्यशास्त्र.pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातावरण व वाताभिसरण हवेची घटना ४१ हवा अनेक वायूंचे मिश्रणानें झाली आहे. हवा रासायनिक संयुक्त पदार्थ नाहीं. वाफ काढून टाकल्यावर हवेचें पृथ:क्करण करून पाहि- ल्यास खालील द्रव्ये त्यांत सांपडतात. आकारमानाने असलेली त्यांचीं प्रमाणें खाली दिलीं आहेत. प्राणवायु ( ऑक्सिजन ) ......२०.९४ नैट्रोजन .....७८.०९ आर्गन ०.९४ कॅर्बानिक अॅसिड वायु ०.०३ १०० वरील चार वायूंपैकीं प्राणवायु हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. ह्याचेवांचून प्राणरक्षण व ज्वलन अशक्य असतें. कॅर्बानिक अॅसिड वायु हा प्राणिमात्रांना अपायकारक आहे. परंतु कांहीं मर्यादेपर्यंत त्याचेपासून नुकसान होत नाहीं. प्राणवायूची तीव्रता कमी करणें एवढाच नैट्रोजनचा उपयोग आहे. हवेंत असणाऱ्या वाफेचें प्रमाण अस्थिर असतें. उच्छ्वासांत बाहेर पडलेली वाफ व जमिनीवर पडलेल्या उद्भिज व प्राणिज पदार्थांच्या कोथभवनानें उत्पन्न झालेले वायु व धुळीचे व अन्य रजःकण, ओझोन, खनिज क्षार, अमोनिआ, शंखद्राव (नैट्रिक ऍसिड ), नेऑन, हेलिअम्, झेनॉन, कार्ब्युरेडेड हैड्रोजन हैड्रोजन है पदार्थ हवेमध्यें सांपडतात. ह्यांशिवाय शहराचे क्षेत्रांतील हवेंत सल्फ्यूरस ॲसिड् व सल्फ्युरेटेड हैड्रोजन हे असतात. वरील मुख्य चार वायूंचें परस्पर प्रमाण जगाचे प्रत्येक भागांत सारखें असतें. शहरांमधील हवा अनेक कारणांनीं बिघडते. तरी तिची. घटना आणि डोंगर व समुद्र ह्या ठिकाणच्या हवेची घटना ह्यांमध्यें म्हणण्यासारखा फरक नसतो. ह्याचें कारण अशुद्ध झालेली हवा वाऱ्याचे