पान:आरोग्यशास्त्र.pdf/५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
(२)

आहे. माझ्या ह्या अल्प प्रयत्नाने ह्या कामी अत्यल्प जरी उपयोग झाला तरी मी कृतार्थ होईन.
 वैद्यक शाळा, नर्स किंवा मिडवाइफ ह्यांचे वर्ग ह्यांना प्रस्तुतच्या पुस्तकाचा पुष्कळ उपयोग होईल असा भरंवसा आहे. त्याच प्रमाणे साधारण जनतेपैकी थोडें शिक्षण संपादन केलेल्या लोकांनाहि ह्या ग्रंथापासून फार फायदा होईल.
 पार्क व केनवुड, हैजीन ह्या सर्वमान्य पुस्तकाच्या आधाराने मी हे आरोग्यशास्त्र लिहिले आहे. घोस व दास ह्यांच्या हैजीनपैकी काही माहिती ह्यांत घातली आहे. मुंबई येथील ग्रँट मेडिकल कॉलेजला १८६० च्या सुमारास जोडलेल्या मराठी वैद्यक वर्गासाठी विद्वान् डॉक्ट- रांनी लिहिलेल्या व सरकारने मान्य केलेल्या पुस्तकांतील पारिभाषिक शब्द मी वापरले आहेत. पुस्तकांतील भाषा शक्य तितकी सोपी वापरली आहे. ग्रंथ सुलभ व्हावा म्हणून त्याच्या शेवटीं कठिण शब्दांचा कोश दिला आहे.
 प्रत्यक्ष पुस्तकांत कोठेहि चूक राहूं नये ह्याविषयी पूर्ण खबरदारी घेतली आहे. त्यांतून काही किरकोळ दोष असल्यास त्यांकडे विद्वानांनी दुर्लक्ष करावे अशी प्रार्थना आहे. .

ग्रंथकर्ता.