पान:आरोग्यशास्त्र.pdf/५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ आरोग्यशास्त्र जोरानें अन्य ठिकाणीं जातें व तिचे जागीं ताजी येते. पावसामुळे हवें- तील घन व वायुरूप पदार्थ व पृथ्वीवरील घाण पदार्थ धुऊन जातात. उछ्त्रास व ज्वलन ह्यांचेपासून उप्तन्न होणाऱ्या व मनुष्यादि प्राणि- मात्रांना अपायकारक अशा कॅर्बानिक ऍसिडवायूस वनस्पति दिवसा पानांचे साहाय्यानें स्वघोषणासाठीं आपल्यामध्यें शोषून घेतात. अशा प्रकारें हवा शुद्ध राहते. कॅर्बानिक अॅसिड वायु हा उप्तन्न होण्याची कारणें मुख्यतः तीन आहेत, ती अशी:- श्वासोच्छ्वासन, ज्वलन आणि प्राणिज व उद्भिज पदा- कोथभवन. वाफः - हवेमध्यें वाफ नेहमी असते. परंतु तिचें प्रमाण फार अस्थिर असते. तिचें मान हवेंतील उष्णतेवर अवलंबून असतें. समशीतोष्ण प्रदेशांतील हवेंत ती कमी असते व विषुववृत्ताकडील हवेंत ती ज्यास्त असते. जमिनीवरील हवेंत ती कमी असते व समुद्रावरील हवेंत ती जास्त असते. हिंवाळ्यापेक्षां उन्हाळ्यांत वाफेचें प्रमाण हवेमध्यें अधिक असतें. सकाळ पेक्षां संध्याकाळीं तें वाढते. ओझोनः - हा घनीभूत प्राणवायु आहे. ह्याला चमत्कारिक वास येतो. पोटॅश आयोडैड व स्टार्च ह्यांमध्ये भिजवलेला टिपकागद ओझोन- मुळे निळा होतो. हा वायु ज्वालाग्राही आहे. हा पाण्यांत अंशतः विर- घळतो. शहरांतील हवेमध्ये हा नसतो; तेथें सांपडलाच तर अत्यंत अल्प प्रमाणांत असतो. विजेमुळें आणि समुद्र व सरोवरें अशा मोठ्या जलाशयाचे बाष्पीभवन होतांना ओझोनची उप्तत्ति होते. म्हणून हा समुद्राचे व सरोवराचे किनाऱ्यावरील हवेंत फार सांपडतो. ओझोन- मध्ये असणारा अधिक प्राणवायु त्यापासून लवकर मुक्त होतो व हा भाग अशा स्थितीत सेंद्रिय पदार्थांशीं संयुक्त होऊन त्यांतील कुजणाऱ्या भागांना शुद्ध करतो.