पान:आरोग्यशास्त्र.pdf/५२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ आरोग्यशास्त्र बाहेर पडलेल्या हवेंत शेकडा ४ भाग ऑक्सिजन कमी होतो व शेकडा ३.५ ते ४ भाग कॅर्बानिक वायु अधिक होतो. नैट्रोजनचे प्रमाण स्थिर असतें. उच्च्छ्रासाचे हवेची उष्णता ९८.४ असते. त्यांत शेकडा ५ भाग वाफ असते व देहांतील सूक्ष्म विगलित कण त्याबरोबर बाहेर येतात. स्वस्थ बसलें असतां प्रौढ मनुष्याचे शरिरांतून ताशी ०.९ घनफूट कॅनिक वायु बाहेर पढतो असें प्रत्यक्ष प्रयोगावरून ठरविलें आहे. जोराची मेहनत करीत असतां १ ८ घनफूट वायु दर ताशीं निघतो. स्त्रियांमध्ये हें प्रमाण पे नें कमी असतें. पुरुष, स्त्रिया व लेकरें अशा मिश्र समुदायांत दर माणशी सरासरी ०.६ घनफूट वायु दर ताशीं निघतो. मनुष्यानें बाहेर टाकलेल्या हवेचें पुनः पुनः श्वासोच्छ्रासन केल्यानें प्रकृति कमजोर होते व आजाराचे उद्भवास अनुकूल स्थिति मिळते. एकाद्या ठिकाणी अतिशय गर्दी झाली व तेथील शीतमान बेताचे असलें तर कॅर्बानिक वायूचीं अपायकारक चिन्हें तात्काल नजरेस येत नाहींत. पण तेथील उष्णता वाढल्यास डोके दुखणे, डोकें फिरण्याचा भास, छातीत जडत्व, अंग गळणे, चक्कर, मळमळ, इत्यादि भावना होतात. वास वेगाने चालतो. एकाद्या खोलीतील मनुष्यसंख्येप्रमाणे तेथील कॅर्बानिक वायूचे प्रमाण थोडें बहुत वाढतें. ह्या वायूचें हवेंतील प्रमाण १०००० स ३ ते ४ असतें. गर्दीच्या खोल्यांतून तें ५० पर्यंत चढतें. हें प्रमाण ५०० पर्यंत पोहोंचेपर्यंत अशुद्ध हवेचे तात्काळ दुष्परिणाम अनुभवास येत नाहींत. उच्च्छ्वासाबरोबर हवेंत प्राणिज स्थूल व वायुरूप द्रव्ये येत असावीत. ह्या शिवाय मानव देहांतून कांहीं दुर्गंधी वायुरूप पदार्थ बाहेर येत असावेत. म्हणून मोकळ्या हवेंतून भरलेल्या किंवा वातसंचार नसलेल्या कोठडीत " शिरल्यावर एक प्रकारची कुबट व कोंदट घाण येते. वाफेचा ओलावा व चढत्या उष्णतामानाचे दुष्परिणाम प्रकृतीवर विशेष होतात हे वर लिहिले आहे.