पान:आरोग्यशास्त्र.pdf/५३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातावरण व वाताभिसरण सूक्ष्म जंतु ४५. संथपणाने श्वासोच्छ्रासन चाललें असतां फुप्फुसांतले सूक्ष्म जंतु उच्छ्रसांत येत नाहींत. परंतु खोकतांना, शिंकतांना, मोठ्याने बोल- तांना ह्या जंतूंचे लोट बाहेर पडतात. फुप्फुसांतील सर्व प्रकारचे जंतु रोगजनक असतात असें नाहीं. परंतु पडसें, कृकांतील सर्दी, इन्फ्ल्यु- एन्झा, घटसर्प, क्षयग्रंथी व इतर कांहीं विकारांतील रोगजनक जंतु ह्या मार्गानें बाहेर पडून त्या त्या रोगांचा फैलाव करतात. परंतु आपण दूषित हवेंत राहिलो तरी नेहमीं कृमि फुप्फुसापर्यंत पोहोंचत नाहींत. कारण नाकांतील केसांत व नाक, तोंड व घसा येथील आई म्युकस - त्वचेंत ते अडकून पडतात व त्यांतील खावाबरोबर ते बाहेर येतात. स्पर्शसंचारी जंतु बहुधा शोषले जात असून ते सूक्ष्म वातपेशी (एअर सेल्स) पर्यंत बहुधा पोहचत नाहींत. शरीराचे बाहेर सोडलेल्या हवेचा परिणाम मनुष्यावर नेमका कोणता होतो हें रासायनिक पृथःकरणानें बरोबर दाखवितां येत नाहीं. जो होतो त्यामध्ये मनुष्याचे चर्मांतून जाणाऱ्या वाफेचें व दुर्गंधीचें कांहीं तरी साहाय्य होतें. परंतु चर्मांतून जाणारी घाण, उच्छ्वासाची हवा, त्यापासून होणारी व अन्य कारणो- त्पन्न आर्द्रता व उष्णता ह्या सर्वांपासून हवा अपायकारक व दोषी होते हें सिद्ध झालें आहे. उष्णता व आर्द्रता उत्पन्न झालेल्या पण कोंदट जागेतील पुन्हा पुन्हा सोडलेल्या हवेमध्ये राहण्यापासून व तीच तीच हवा श्वासांत घेतल्यापासून प्रकृतीस खास अपाय होतो. कारण त्यांतील स्वास्थ्यदायक कांहीं एक प्रकारचा गुण नाहींसा होतो. सभागृहासारख्या स्थानीं उष्णता व आर्द्रता ह्यांची जांड जर उच्छूसित हवेला मिळाली तर आधीं अपाय घडतो हें वर लिहिलें आहे. एकाद्या खोलीत राहणाऱ्या दर माणसाचे वाटणीस जी घनफूट जागा येते त्या मानानें त्यांतील हवा शुद्ध किंवा अशुद्ध राहील. तेथें