पान:आरोग्यशास्त्र.pdf/५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४६ आरोग्यशास्त्र कितीही वातसंचार केला तरी उंचवट्याचे खुल्या मैदानाइतकी तेथील हवा शुद्ध होणार नाहीं. तरी पण ती प्रकृतीस अपायकारक न राहण्या- इतकी शुद्ध ठेवतां येते. अशुद्ध हवेमध्ये राहण्यानें मुलांना रिकेट्स् नामक अस्थिविकार होतो व वृद्ध लोकांना निरक्तता, अग्निमांद्य, थकवा हे विकार होतात. खुल्या मैदानांत मेहनत करणाऱ्या लोकाचे अंगीं शीघ्र- गामी रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ति असते त्याप्रमाणें सर्वकाल कचेऱ्या, कारखाने इत्यादींमध्ये काढणाऱ्या लोकांचे अंगी नसते आणि विलंबी व शक्तिप.त करणारे विकार त्यांना जडतात. डॉ. ओगले यांना शोधाअंती असे आढळून आलें आहे कीं उद्योगधंदे करणाऱ्या लोकांपैकीं माळी, शेतकरी, भोई, म्हणजे खुल्या मैदानांत काम करणारे लोक सर्वात निरोगी असतात. वरील धंद्य तील लोकांत क्षयाचे व फुप्फुसाचे विकारांचे प्रमाण इतरांपेक्षां सुमारे निम्यानें असतें. क्षयाचा व गर्दीमुळे कोंडलेली हवा व वायुसंचाराचा अभाव यांचा कार्यकारणभाव आहे हे आतां सर्वांना मान्य झालें आहे. पलटणीतील शिपाई, सरकारी आरमारावरील खलाशी, तुरंगातील कैदी ह्यांना जेव्हां पूर्वी खूप गर्दीने व वायुसंचार अपुरा असलेल्या कोठड्यांतून राहावें लागे, त्यावेळी त्यांचे वर्गांतील परंतु इतर कामे करणाऱ्या लोकांमध्ये होणाऱ्या क्षयाचे प्रमाण कमी असे, व ह्या सरकारी शिपायांत व कैद्यांत तें अधिक असे. परंतु, हल्लीं त्यांचें अन्नपाणी व शारीरिक श्रम ह्यांमध्ये बिलकूल अंतर केलेलें नाहीं. तरी फक्त त्यांच्या राहण्याच्या जागा उंच, खुल्या व हवाशीर केल्यानें ह्या लोकांत क्षयविकाराचे प्रमाण, त्यांच्याच वर्गांतील अन्यत्र राहणाऱ्या लोकांपेक्षां निम्मे झाले आहे. क्षयरोगाचें कारण ट्युवल नामक एक स्पर्शसंचारी ग्रंथी आहे व तो क्षयी मनु- ष्याचे बडक्यांत व लाळेत असतो हें कॉचनें सिद्ध केलें आहे. जंतूंचा प्रसार कोंदट व गर्दीच्या जागेंत होईल हे उघड आहे. घरामागें घर चिक-