पान:आरोग्यशास्त्र.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातारण व वाताभिसरण ४७ टून असलेल्या जागीं वायुसंचार पुरेसा होत नाहीं व अशा स्थळीं राह- णाऱ्या लोकांना क्षयरोग जास्त होतो असे आढळून आले आहे. स्पर्श- संचारी विकाराचा फैलाव अशा जागेत राहणाऱ्या लोकांत अधिक होतो. उबट, बंद व कोंदट जागेत राहणाऱ्या लोकांना पडसे, खोकला, गुजराथी हे विकार अधिक लवकर जडतात. असल्या हवेंत घशाचे विकार उत्पन्न होतात. (हॉस्पिटल) रुग्णालयांत आजाऱ्यांच्या खोलीत चर्माचे विगलित कण व वाळलेल्या पुवाचे सूक्ष्म कण हवेंत फिरत व तरंगत असतात. ह्यामुळे जंतूंच्या जातींप्रमाणे घसा धरणें, मेंडक्या येणें, चर्मविकार, धावरे डोळे येणें, पाएमआ, सेप्टिसिमिआ इत्यादि विकार फैलावतात. हा प्रकार हॉस्पिटलमध्यें पुष्कळ अधिकतेने होतो. दवाखान्यांत जखमा असलेल्या रोग्यांना स्पर्शसंचारी विकार फार जल्दी जडतात. म्हणून भयंकर रोगाची साथ सुरू झाली तर, जखमायुक्त सर्व रोग्यांना एकदम दुसरीकडे हालवावें लागतें. म्हणून स्पर्शसंचारी रोग्यांना स्वतंत्र स्थळीं निराळें ठेवण्याची व्यवस्था हल्लीं केली जाते. आतां दवाखाने हवाशीर बांधले जातात व आरोग्यदायक सर्व व्यवस्था ठेवून जंतुनाशक द्रव्यांचा मुबलक उपयोग करतात; म्हणून उग्र स्वरूपाच्या स्पर्शसंचारी विकारांचें बहुतेक निर्मूलन झालें आहे. टीनिआ, टान्शूरन्स ह्यांप्रमाणें स्पर्शसंचारी रोग्याचे विकृत भाग- तील विगलित कण हवेमध्ये उडून त्यांमुळे वरील प्रकारच्या स्थानीं स्पर्श- संचार होतो. ज्वलनापासून हवेमध्ये होणारे दोष लाकडे, कोळसा, इत्यादि पदार्थ जळणें म्हणजे त्यांचा हवेंतील ( ऑक्सिजन ) प्राणवायूशी संयोग होणें हें प्रत्येकास माहीत आहे. म्हणून कोणत्याही पदार्थाचे ज्वलनाने हवेंतील प्राणवायु कमी होतो.