पान:आरोग्यशास्त्र.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ आरोग्यशास्त्र रक्तशुद्धि करणें हें या वायूचें काम आहे. १ शेर दगडी कोळशाचें पुरतें ज्वलन होण्यास ४८० घन फूट हवा लागते. सुधारलेल्या देशां. तून धुराचे दिवे जाळण्याचा प्रघात आहे. त्यांच्या ज्वलनापासून प्राण- वायू तर खर्च होतोच, परंतु पुष्कळ अपायकारक पदार्थ नवीन निर्माण होतात. त्यापासून निघणारे पदार्थ:- कॅर्बानिक अॅसिड शेंकडा ५० ते ६० पाणी " १६ 37 कॅर्बानिक ऑक्साईल ५० ते ६० ( हें द्रव्य पुरतें ज्वलन न सल्फ्यूरिक अॅसिड ह्याचा अंश. झाल्यास कमी उत्पन्न होतें. ) दीड तोळा (३०० ग्रेन) तेल किंवा मेणबत्ती जाळल्यानें १ घनफूट कॅर्बानिक वायु उत्पन्न होतो व १० घनफुट हवेंतील प्राणवायु नाहींसा होता. ज्या शहरांमधील कारखान्यांतून व घरांमधून दगडी कोळसा वापर- तात त्या शहरांचे वातावरणांत सल्फ्यूरिक अॅसिड असतें. त्या ठिकाणीं पडणारे पावसाचें पाणी किंचित् आम्ल असतें. त्या स्थानांतील इमार- तींचा चुना, प्लॅस्टर वगैरे मृदु द्रव्यें बिघडून जातात. धुराचे किंवा कोण- त्याही तेलाचे दिवे जाळल्यापासून उत्पन्न होणारे वायुरूपी पदार्थों- पासून हवा दूषित होते. एकटा कॅर्बानिक अॅसिडवायु शेकडा दोन भागपर्यंत हवेंत असला तरी त्यापासून शरीराला समजेसा अपाय घडत नाही. परंतु याहून अधिक असल्यास डोके दुखणें, मळमळ इत्यादि भावना होतात. शेंकडा ८/१० भाग असल्यास एकाएकी मृत्यु येतो. परंतु कर्बानिक ऑक्साइड वायु हा अल्प प्रमाणांत देखील मोठा विषारी आहे. हा हवेमध्ये शेकडा भाग असला तरी त्यामुळे जीव गुदमरून येतो. हा वायु रक्तांतील हिमोग्लाविन नामक द्रव्यांतील ऑक्सि- मृत्यु