पान:आरोग्यशास्त्र.pdf/५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातावरण व वाताभिसरण ४९ जनला दूर करून त्याचे जागीं बसतो. ह्मणून सर्व शरिराला प्राणवायु पोचविण्याचे काम रक्ताचे हातून होत नाहीं. ह्यामुळे प्रधान मज्जेचा (मेंदूचा ) शक्तिपात होतो. ह्याप्रमाणें तो मोठा स्मृतिनाशक व मादक विष आहे. ह्याची क्रियाही न कळत होते. ह्या वायूला दुर्गंध नसतो. हुंगल्याने ह्यापासून खोकला वगैरे येत नाहीं. ह्या वायूपासून एकाएकी हलवेनासें होतें. म्हणून विषारी हवेंतून निघून जावें असें मनांत आलें तरी रोग्याचें कांहीं न चालल्यानें मृत्यु येतो. गिरण्यांचे नजीक राहणाऱ्या लोकांच्या प्रकृति तेथील अधिक धुर- कट हवेपासून सामान्यतः बिघडलेल्या दिसत नाहीत. परंतु दमा व कास असणाऱ्या लोकांना त्यापासून निःसंशय अपाय होतो. ( कोलगॅस ) दिव्याचा धूर थोडा जरी घरांत आला तरी त्यापासून पडजीभ लांब होते, व घशाला घरे पडतात. चिमणीवाटे सबंध घूर बाहेर न जातां मध्येच एकाद्या छिद्रावाटे त्यांतील धूर घरांत शिरल्यास गंधकासारखी घाण सुटते. प्राणिज पदार्थ सडल्यापासून होणारे हवेतील दोष. पेवाचे साधे शौचकूप, मैला - मोन्या यांत असणारी प्राणिज व उद्भिज उत्सर्जित द्रव्यें कुजतात व फेसाळतात आणि त्यांपासून खालील प्रकारचे वायु उत्पन्न होतात. कॅर्बानिक अॅसिडवायु, सल्फ्युरेटेड' हैड्रोजन, अमोनिअम सल्फैड, कार्बन बैसल्फैड, कार्ब्युरेटेड हैड्रो- जन, नैट्रोजन व इतर पदार्थ, जसे टोमेन्स व ल्युकोमेन्स, ह्यांपासून प्रकृतीस अपाय होतो. वरील प्रकारचे जागेंतील हवेमध्ये तेथील घन पदार्थांचे सुक्ष्म रजःकरण व मृत आणि सजीव बॅक्टेरिआ मोल्ड्स व फंगी आणि त्यांचीं अंडी असे सूक्ष्म जंतु असतात. अर्थात् ह्या जानें- तील हे जंतु वाऱ्यामुळे दूरवर पसरतात व ह्यामुळे स्पर्शसंचारी विका