पान:आरोग्यशास्त्र.pdf/५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० आरोग्यशास्त्र रांचा फैलाव होतो. घरांत किंवा अगदीं लगत शौचकूप असले व मैला- मोऱ्यांचे निकाल नीट नसले तर, नजीक राहणाऱ्या लोकांची प्रकृति अशक्त राहते. निरक्कता, क्षुधानाश, थकवा, अतिसार, ज्वर, मस्तकशूळ, वांती, घसा धरणें इत्यादि विकार त्यांना होतात. टैफाइड, पाएमिअ, सेप्टिसीमिआ, सूतिकाञ्वर, धावरें, घटसर्प हेही विकार होतात. किंवा नुसताच क्षीणपणा येतो व कोणताही नवीन विकार चटदिशीं जडतो. त्याचा प्रतिकार करण्याचा जोम शरिरांत राहात नाहीं. मैला-मोऱ्यांचा निकाल नीट होत नसेल अशा घरच्या लोकांना मेंडक्या होतात व रक्त बिघडून गळवें, केस्तुडें व चाळपोळ्या इत्यादि विकार होतात. असल्या किंवा इतर घाणेरड्या ठिकाणचे पाणी जोराने हललें ह्मणजे वायु अधिक बाहेर पडतात व अधिक अपाय घडतो. तें पाणी संथ - पणाने चाललें तर फार अपाय होत नाहींत. . नदीचें पाणी गढूळ असल्यास व घाण मारूं लागले म्हणजे त्यापा- रोगोत्पत्ति होते. त्याचप्रमाणें खतें तयार करणे, चरबीचा साबू सून करणें कातड्याचें काम करणे इत्यादि घाणींच्या धंद्यांत वापरणें किंवा असल्या कारखान्याचें जवळ राहण्यानें विकार जडतात. कुजकी घाण नाकांत शिरल्याने व बसल्याने मळमळ, वदिया, रेच, अन्नद्वेष इत्यादि भावना झालेल्या, कित्येकांनी पाहिल्या असतील. दलदलीचे मुलखांत उद्भिज पुष्कळ पदार्थ कुजत असल्यामुळे तेथील हवेंत कर्दम विष (मलेरियाचें विष) असतें. ह्या शिवाय सल्फ्यू- रेटेड हैड्रोजन, कार्ब्युरेटेड हैड्रोजन, उद्भिज, सूक्ष्मकण, एलजी, बॅक्टे- रिआ फंगी व दुसरे सूक्ष्म जंतु हे असतात. अशा हवेंतील लोकांना मारक जातीचा हिंवताप फार येतो. ज्या ठिकाणीं सल्फ्यूरेटेड हैड्रोजन फार असतो, तेथील लोकांना निरक्तता व क्षीणता हे विकार होतात.