पान:आरोग्यशास्त्र.pdf/५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातावरण व वाताभिसरण कारखान्याच्या हवेंत उत्पन्न होणारे दोष ज्या धंद्यासंबंधानें उत्पन्न होणाऱ्या वाफा व सूक्ष्म कण फुप्फुसांत शिरल्यानें तेथें क्षोभ उत्पन्न होतो आणि ज्या धंद्यासंबंधानें मजुरांना अस्थिर व पालटणाऱ्या उष्णमानानें हवेंत काम करावें लागतें, असें दोन प्रकारचे धंदे प्रकृतीस हानिकारक आहेत. कापसाचे व कापडाचें कामांत व धातूंचे किंवा भांड्यांचें कामामुळे हवेंत उडणारे सूक्ष्म रजःकण श्वासाबरोबर फुप्फुसांत जातात. ही क्रिया बरीच वर्षे किंवा महिने चालल्यानें कास, वात, फुप्फुस, गुज- राथी व क्षय इत्यादि विकार होतात. ह्रीं कामें खुल्या जागेंत केल्यास अपाय कमी होतो. गिरण्यांतील हवेशीर जागेत केल्यास त्याहून अधिक अपाय घडतो व ज्या गिरण्यांत किंवा गिरण्यांचे भागांत मजुरांची दाटी असून हवेची उष्णता व आर्द्रता ज्यास्त असते, तेथें काम करण्यानें पुष्कळ व जलदी अपाय घडतो. हवेमध्यें उडणारे रजःकण गोल असल्यास अपाय कमी होतो. ते कोचदार असल्यास हानि फार होते. दगडी कोळशाचें काम करणाऱ्या मजुरांच्या छातींत खनिज कण शिरतात तरी ते गोल असल्यामुळे त्यांना कितेक वर्षेपर्यंत अपाय घडत नाहीं. कोचदार कण फुप्फुसाचे एअर सेल्समध्यें घुसतात व कफा - बरोबर लवकर किंवा सर्व बाहेर पडत नाहीत. क्षय व श्वासोच्छ्वसनच्या इंद्रियांच्या रोगांपासून होणाऱ्या मृत्युसंख्येचे तुलनात्मक कोष्टक २५ते ६५ वयापर्यंतचे टोकांसंबंधी माहिती ह्यांत आहे. ज्या धंद्यांत काम करण्यानें सूक्ष्म कण श्वासाबरोबर आंत जातात. अशा कामासंबंधानें होणारी मृत्युसंख्या येथें दाखविली आहे. क्षय, फुप्फुसाचे विकार, बेरीज. दगडी कोळसेवाला मजूर १२६ २०२ ३२८ सुतार व सोडकामाचा सुतार २०४ १३३. ३३७