पान:आरोग्यशास्त्र.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकाशकाचे दोन शब्द

 मी एका ग्रन्थाचा प्रकाशक होईन असे मला स्वप्नीहि वाटत नव्हते; परंतु ईश्वरी लीला अगाध आहे. माझे पूज्य वडील कै. डॉ. सदाशिव रामचन्द्र गोखले, यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ही गोष्ट खरी तरी ती सर्व लोकसेवेस सादर करणे शक्य होईल असे वाटले नाही, वाटत नव्हते. त्यांच्या अनेक पुस्तकांपैकी एकास, " आरोग्यशास्त्रास," ग्वालियरचे विद्याधिकारी मंडळींनी उदार अन्तः- करणांनी बक्षिस दिल्या कारणाने हा ग्रंथ छापून काढावा असें मनांत आले. परंतु द्रव्याभावी ही गोष्ट करण्याचे मी कालावर ढक- लीत होतो; परंतु परमेश्वरी इच्छा काही वेगळीच होती. त्याच्याच कृपेने मला द्रव्यसहाय्य मिळून हे ग्रन्थप्रकाशनाचे काम हाती घेतले व तें आज पुरे होत आहे. ग्रन्थप्रकाशनाच्या कामी अहमदाबाद येथील डॉ. ग. रा. तळवलकर, एल्. एम्. अॅन्ड एस्., यांनी उदार अन्तःकरणाने में सहाय्य केले त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्याच सहाय्याने हा ग्रन्थ प्रकाशित होत आहे हे कबूल करण्यांत मला फार आनंद होत आहे. त्याचप्रमाणे ग्रन्थप्रकाशनाचे कामी समर्थभारत छापखान्याचे व्यवस्थापक रा. रा. सरदेसाई, बी. ए., एल्एल्. बी., यांनी काळजीपूर्वक व नीटनेटके काम केल्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. प्रुफें तपासण्याचे कामी ज्या माझ्या मित्रांनी, विशेषतः रा. रा. दत्तोपंत तळवलकर व रा. रा. नरहर बापूजी माणके यांनी मला सहाय्य केलें त्यांचाहि मी आभारी आहे.
 या ग्रन्थांत मूळच्या प्रतीत बिलकूल फरक केलेला नाही. वाचकांनी हा ग्रन्थ आपला समजून गोड करून घ्यावा.

प्रकाशक.