पान:आरोग्यशास्त्र.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ आरोग्यशास्त्र करणाऱ्या लोकांना गुजराथी, कास, क्षय, एंफिसीमा, इ० रोग फार होतात. चिनई मातीची भांडी करणारांमध्ये मृत्युसंख्या कथलांतले खाणीं- तल्या लोकांइतकी असते. त्यांना बंद व गरम जागेंत काम करावें लागतें - बारीक तीक्ष्ण कण त्यांचे श्वासमार्गांत जातात व भिन्न उष्णमानाचे जागेत वरचेवर जावें लागतें. हत्यारे, सुया, टांचण्या व कानशी इत्यादींचे कारखान्यांतील काम करणाऱ्यांना कास, दमा, क्षय, इ० रोग होतात. असल्या कारखान्यांत टेबलावर पडणारे धातूचे कण खालीं घरंगळून जावे अशी व्यवस्था केलेली असते. कामकरी तोंडावर जाळीं बांधतात, त्यामुळे श्वासमार्गांत धूळ शिरत नाहीं. पोलादाच्या कारखान्यांतील कामकरी लोहचुंबकाच जाळी वापरतात. तांबें, शिसें, फास्फरस, पारा इत्यादि विषारी पदार्थांचे खाणीत काम करणाऱ्यांना त्या त्या धातूंचा विषार बाधतो. बॉयलर करण्याचे किंवा इतर कारखाने, ज्यांत मोठा खणखणाट चालतो अशा स्थळीं काम करणाऱ्या लोकांना बधिरता येते. म्हणून कानांत दट्टे घालून काम करावें लागतें. वरील व इतर कारखान्यांत धूळ फुप्फुसांत जाते तिचा परिणाम प्रथम नाकाचे श्लेष्मल त्वचेवर होतो. तो करवडते; तिच्यांत व्रण पड- तात. पुढें ती संकोचित होते व गंधज्ञान नष्ट होतें श्लेष्मल त्वचेचा संकोच झाल्यानें धुळीचे कणांना फुप्फुसांत पोहोचण्याला जो स्वाभा- विक प्रतिबंध असतो तो दूर होतो. त्यामुळे त्यांचा प्रवेश तेथें सुलभ होतो. तदनंतर फुप्फुसांत तंतुमय ग्रंथी उत्पन्न होतात. कांहीं कालानंतर त्या ग्रंथी फुटतात व त्या जागीं क्षतें पडतात; व क्षतांत क्षयजंतूंचा संचार होतो.