पान:आरोग्यशास्त्र.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातावरण व वाताभिसरण ५५ दुर्गंधीचे धंदे ह्या सदरांत रक्त शिजविणे, अस्थि शिजविणे, कातडे शिजविणें, चरत्री शिजावर्णे, ढोरकाम, चांभारकाम, सरसाचें काम इत्यादि धंदे येतात. ह्या कामांतील दुर्गंध व उपद्रव कमी व्हावा म्हणून खालील उपाय योजावे. १ आरोग्य खात्यांतील अधिकाऱ्याला ती सर्व जागा पाहिजे तेव्हां तपासण्याचा अधिकार असावा. २ योग्य प्रकारच्या सोयी असलेल्या इमारतींत हीं कामें करूं द्यावी. ३ असल्या इमारतींतून उजेड भरपूर व हवा खेळती असावी. जमीनी- वरील फरशा रोज रात्रीं धुवाव्या. मैलापाण्याच्या मोऱ्या असून त्या पाटाला जोडलेल्या असाव्या. दरसाल निदान दोन वेळां इमारतीला सफेती द्यावी. ४ जीं द्रव्ये वापरावी लागतात ती चांगली सुकवून व कातडी चुन्याचे पाण्याने धुऊन व सुकवून स्वतंत्र जागेंत सांठवून ठेवावी. ५ शिजविण्याचें काम वाफ कोंडलेल्या पात्रांत करावें. ६ सर्व प्रकारचा केरकचरा, त्याज्य व निरुपयोगी पदार्थ रोजचे रोज हालविले पाहिजेत. ७ कातडें भिजत ठेवलेलें पाणी रोज एकदा तरी फेकून दिलें पाहिजे, म्हणजे दुर्गंध कमी सुटतो. ८ निरुपयोगी चुन्याचें पाणी लागलींच फेकून द्यावें. ९ सर्व हत्यारे व भांडीकुंडीं स्वच्छ ठेवावीं. २० वरील कायद्याचें उल्लंघन करणाऱ्यांना शिक्षा द्यावी. खालील प्रकारचे आणखी नासके धंदे आहेत. (१) मासे तळणे. (२) ढोरकाम, रोगानें मेलेल्या जनावरांचा रोजगार करणें. (३) डुकरें राखणें. (४) कृत्रिम ( विशेषतः प्राणिज ) खत करणें. (५) कागद करणें .