पान:आरोग्यशास्त्र.pdf/६४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५६ आरोग्यशास्त्र निरनिराळे धंद्यांत बाधणारे विषार शिशाचा विषारः -- चर्म, श्लेष्मल त्वचा व फुप्फुसाचे द्वारा शिशाचा प्रवेश शरिरांत होऊन त्याचा विषकारक परिणाम होतो. रंगारी, चितारी, चिनीमातीची भांडी करणारे कांच दणारे, एनॅमेल करणारे, कासे करणारे, शिशाचे ओले व सुके रंग करणारे इत्यादिकांचे धंद्यांत शिशाचे विषारी परिणाम घडतात. ह्या कामी आरोग्यासंबंधी खालील तजविजी कराव्या. ( १ ) कारखान्यांतील उत्पन्न होणाऱ्या वाफा व धूळ पैदा झाल्या- बरोबर दूर करावी. (२) ही धातु अथवा हिचे पदार्थ हातानें होईल तितके वापरू नयेत. ( ३ ) स्वच्छता राखण्याबद्दल मजुरावर सक्ति ठेवावी. हात, नखें, तोंड व दांत वरचेवर धुवावे. ( ४ ) मानेचे वर व मनगटाचे वर ह्या धातूचे कण जाऊं नयेत म्हणून त्या त्या भागीं गच्च बसणारे क्षितिजसमांतर पट्टे बसवावे. मुख व नासिकेला जाळी बांधावी. (५) कारखान्याचे इमारतींत जेवण्याची मनाई करावी. ( ६ ) डॉक्टरचेकडून वरचेवर मजुरांची तपासणी करावी. (७) सल्फ्यूरिक अॅसिडाचें लेमोनेड प्यावे. म्हणजे शरिरांत भिन- लेले शिशाचे अपायशून्य क्षार बनतात व बरीच हानी टळते. (८) कारखान्याची इमारत हवाशीर, उजेडाची व स्वच्छ असावी. फास्फरसः- ह्याचा विषार काड्याच्या पेट्या करणारांमध्ये होतो. फास्फरस, ब्रांझ व वर्मिन-किलर नामक पूड करणारांना ह्याचें विष बाधतें. हाडापासून फास्फरस करणारांना तर ह्याची बाधा होण्याचा अधिक संभव असतो.