पान:आरोग्यशास्त्र.pdf/६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातावरण व वाताभिसरण आरोग्यासंबंधी सूचनाः- ५७ ( १ ) पिवळा फास्फरस हवेच्या प्रत्येक किंवा कोणत्याही उपमानांत पेटतो. म्हणून ह्याचा उपयोग बंद करावा. (२) दातांची तपासणी ठेवावी. ( ३ ) क्षाराचे द्रावणानें मुख ध्रुवावें. स्वच्छता फार ठेवावी: ( ४ ) खुल्या जागेत फास्फरससंबंधीं कामें करावी; कारखान्यांत जेवण्याची मनाई असावी. (५) आगकाड्या बुचकळणे, वाळवणें व पेठ्यांत भरणें ह्रीं कामें यंत्राने करावी. भावनाः- - घशांत जळजळ, मळमळ, वांती, पोट दुखणे, हगवण, दांत किडणें व पडणे, दाढा कुजणे, रक्ताची दुर्बलता, कावीळ, मेंदुची व स्नायुची अशक्तता. ह्यांत विशेष हें कीं, वांती अंधेरांत नेऊन पाहिली असतां ती कधीं कधीं चकाकते. पारा - ह्याचा विषार, हिंगुळाचा रंग, कृत्रिम ब्राँझिंग, उष्णतामापक यंत्र (थर्मामिटर), वायुमापक यंत्र (बॅरॉमिटर), मुलामा करणारे, आरशाला पारा लावणारे, कॅलोमेल, रस कापूर, रेड ऑक्साइड ऑफ मर्क्युरी करणारे, टोप्या करणारे, विजेचे मापक व विजेचे दिवे करणारे ह्या लोकांमध्यें पाऱ्याचें विष भिनतें. भावनाः - लाळ फार येणें, मुखांतील लालोत्पादक पिंड सुजणे, हिरड्या फुगणें व त्यांतून रक्त येणें, दांत हलणे, किडणें व पडणें, श्वासोच्छ्रासास एक प्रकारची घाण येणें, मळमळ, वांती, अन्नद्वेष, पोट दुखणे, क्रम ओरिस (तोंडाच्या स्नायूंचा नाश), ओठ व जिभेवर व्रण - व शरीरास कंप. सोम - सोमलाचे रंगाने तयार केलेले कागद, भिंतींना चिकटवि- ण्याचे कागद, चटया, पडदे, हे वापरण्यानें सोमलाचा प्रवेश शरिरांत