पान:आरोग्यशास्त्र.pdf/६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातावरण व वाताभिसरण ५९ हीं चिन्हें होतात. मृत्यु आल्यानंतर पाहतां फुप्फुसे व रक्ताशय कृष्ण रुधिराने भरलेली आढळतात. विहिरी खाणणारांना ह्यापासून अपकार घडतो. कॅर्बानिक ऑक्सेड - ह्यांपासून गुदमरल्यासारखे होत नाहीं, तर अशक्तता येते व अंथरुणावरून उठवत नाहीं. स्नायु शक्तिशून्य होतात म्हणून दूषित जागेतून निसटतां येत नाहीं. ह्या वायूनें गुंगी येते व रोगी बेसावध होतो. कधीं आचके येतात. मरणोत्तर परीक्षेत रुधिर लाल दिसतें. हवेमध्ये शेकडा ०.३ ह्या प्रमाणांत कॅर्बानिक ऑक्सैड असल्यास नाशकारक चिन्हें झालीं नाहींत तरी निदान अपायकारक भावना होतात. घरांतील केरकचरा. ज्याप्रमाणें श्वासोच्छ्वास व ज्वलन ह्यांमुळे हवा अशुद्ध व हानि- कारक होते त्याप्रमाणें हवेंत उडणाऱ्या केराचे रजःकणांनी देखील हवा पुष्कळ बिघडते. जमिनीवर रोजचे होणारे वर्दळीमुळे भूपृष्ठावरील माती व सारवण्यांत येणारे शेण यांचे कण, सामानसुमान, कपडेलत्ते वापर- ण्यांत आल्यानें त्यांचेपासून झिजून व गळून पडलेले रजःकण, चुली, शेगड्या व दिव्याचे ज्वलनापासून उत्पन्न होणारा धूर व काजळी यांचे कण इत्यादि कारणांनी हवेमध्ये केराचा संचार होतो. वाताचा प्रवाह बंद असला म्हणजे हा केर भिंतीवर व सामानसुमानावर बसतो व हवा खेळू लागली म्हणजे पुन्हा तेथून हलून हवेत तरंगू लागतो. सूक्ष्म- दर्शकामध्यें पाहतां ह्या केरामध्ये काजळी, धातूंच्या जिनसांचे कण, कापसाचे तंतु, फंगी नामक जंतूंची अंडी, पिठाचे कण, गवताचा भुगा, चर्माचे गळलेले सूक्ष्म कण हे दृष्टीस पडतात. ह्यावरून असे दिसून येईल की केराचा बहुतेक भाग सेंद्रिय (ऑरगॅनिक) पदार्थावरून झाला