पान:आरोग्यशास्त्र.pdf/६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आरोग्यशास्त्र आहे, म्हणून त्यांत कुजण्याची क्रिया थोडीबहुत चालूं असते. हा केरं • हवेंत राहिल्यानें मनुष्याची शरीर प्रकृति कमकुवत असते. दाटीच्या व अपुऱ्या जागेत राहणाऱ्या मनुष्यांची प्रकृति कमजोर असते असें आपल्या दृष्टीस पडते. इत्यादि शिरतात. अशा झटलें तर करतां येणार रोजच्या व्यवहारांत सर्व घरांत थोडाबहुत केर व्हावयाचा परंतु मोठ्या -गांवामध्ये बाहेरच्या हवेंतून घरांत घूर केर स्थितीत कराची उत्पत्ति बरीच कमी करूं नाहीं. परंतु असलेला केर काढून टाकणें व जमलेला धुरळा हालविणें हे आपले हाती आहे. घरें नियमित प्रमाणानें साफसूफ ठेवली पाहिजेत. घर पाटलेले नसलें व निजण्याबसण्याचे जागेत अडगळ असली तर - स्वच्छता ठेवतां येणार नाहीं. पेट्यांचे खालून, अडगळीत सांधीकोपऱ्यां- तून धान्यांची पोतीं, भांडी, राहत्या इमारतींत असणारे गुरांचे गोठे, स्वयंपाक घरांतील घेरोसा, न पाटलेल्या घराचे आढ्याला लागणारा धुरळा, साध्या प्रतींध्या म्हणजे चुनेगच्ची न केलेल्या भिंती, - महिने महिने स्नान न मिळणारी तरटे, कडबा, गवत, लाकडें इत्यादि घरांतच सांठविणें, इत्यादि कारणांनी केर होतो, तो लक्षांत येत नाहीं व तसाच पडून राहतो. सर्वच घर स्वच्छ ठेवलें पाहिजे, परंतु निज- ण्याचे खोलीचे स्वच्छतेबद्दल फार जपलें पाहिजे. कारण त्या जागेंत आपण फार वेळ पर्यंत राहतों. ती जागा रात्री बहुधा फार वेळपर्यंत बंद असते व अशा कोंदट व केराच्या जागेंत राहिल्यानें प्रकृति क्षीण होते. निजण्याचे खोलीची जमीन सिमेंटानें तुळतुळीत केलेली असावी. ती दमट नसावी. त्या खोलीला पुरेसा उजेड असावा. तिच्यांत भरपूर हवा खेळेल अशा खिडक्या व द्वारे असावीत. त्यांतील बस्करें, बैठकी, वरचेवर धूत जावीं. खोटींत अडगळ ठेवूं नये. सहज सरकवतां येईल अशी थोडी अडगळ चालेल. जिनसा ठेवण्यास कपाटापेक्षां फडताळें चांगली.