पान:आरोग्यशास्त्र.pdf/६९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातावरण व वाताभिसरण वाताभिसरण (व्हेंटिलेशन ) ६० उच्छ्रास, ज्वलन, केर इत्यादिकांनीं दूषित झालेली हवा काढून टाकून त्या ठिकाणी नव्या ताज्या हवेचा संचार करणें ह्या वाताभिसरण म्हणजे व्हेंटिलेशन म्हणतात. हें दोन प्रकारचें आहे. रस्ते रुंद असणें व घराचे भोवताली खुली हवा असणें ह्यांमुळे होणारे हवेचा व उजेडाचा प्रवेश ह्याला बाह्य वाताभिसरण म्हणतात. व घरें, कारखाने, खाणी ह्यांतील हवा शुद्ध ठेवण्याचे क्रियेला आंतील वाताभिसरण म्हणतात. ऊन, वारा, पाऊस, व वृक्ष ह्या स्वाभाविक शक्तींच्यामुळें हवा शुद्ध रहाते, ही गोष्ट निर्विवाद आहे. परंतु मर्यादित स्थळांतील व. ताभिसरण खालील तीन नैसर्गिक कारणांनी होतें. - (१) वायुरूप पदार्थ एकमेकांत मिसळून जाणें, (२) वायुप्रवाहाची क्रिया, (३) भिन्न उष्णतामानाप्रमाणे हवेचे जडत्वांत होणारे बदल. (१) हलका बायु घन जातीचे वायूमध्ये लवकर व अधिक मिस-- ळतो. ही मिश्रणाची क्रिया विटा व भिंती ह्यांतील रंध्रांमधून देखील चालते. अशा भिंतींमधून होणारें हैं मिश्रण मंदगतीनें व थोडें होतें. श्वासोच्छ्रास व अन्य कारणांनीं कुंद झालेल्या खोलीचीं द्वारें व फटी बंद करून ठेवल्या व खोलीतील हवा अधिक दुर्गंध होण्याची कारणें दूर केली तर भिंतींत व दारांचे फळ्यांत असणाऱ्या सूक्ष्म रंध्रांतून बाहे- रील हलकी शुद्ध हवा खोलीत शिरेल. ह्या रीतीनें हवेची शुद्धि पुरती होणार नाहीं, पण ती सुधारेल. (२) वायु गमनशील असल्यामुळे त्याचे जोरामुळे घरांतील नासकी हवा बाहेर लोटली जाते. (३) उष्णतेमुळे हवा पातळ होते म्हणजे विस्तृत होते, हलकी होते. हलकी झालेली हवा वर चढते व तिचे जागीं बाहेरील घन हवा घरांत शिरते.