पान:आरोग्यशास्त्र.pdf/७०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ आरोग्यशास्त्र बाह्य वाताभिसरण (एक्स्टर्नल व्हेंटिलेशन ) रस्त्यांची रुंदी, घरांची उंची, घरांचे पिछाडीची खुली जागा यांचेवर शरीराचे आरोग्य मुख्यतः अवलंबून असतें. अरुंद बोळ असणाऱ्या व ज्यांचे पिछाडीला लागून घरें आहेत अशा घरांत राहणाऱ्या लोकांची प्रकृति क्षीण असते. सूर्यकिरण कृमिघ्न आहेत. त्यांचा प्रवेश झाल्याने जागा कोरडी राहते व जंतूंचा नाश होतो. लहान बोळांतल्या घरांतील अशुद्ध हवा लवकर व पुरती शुद्ध होत नाहीं. कारण असल्या घरांत बाहेरील वायूचा प्रवेश नीट जोराने होत नाहीं. असल्या कोंदट हवेंत प्राणिज कण तरंगत राहिल्यानें ते कुजतात व असें स्थळ दमट असल्यानें तेथें राहणाऱ्या लोकांची प्रकृति निर्बळ असते. व तेथील लोक रोगग्रस्त होण्यास पात्र असतात. अशा क्षीण झालेल्या लोकांचे अंगची, रोगाचा प्रतिकार करण्याची नैसर्गिक शक्ति लुप्त होते. म्हणून स्पर्श- संचारी विकारांचा प्रसार ह्या लोकांचेमुळे होतो. सूर्यप्रकाश कमी अस- ल्यानें विशेषतः बालकांना क्षीणत्व येतें. सावलटांतल्या झुडपाप्रमाणें तीं निस्तेज व कोमेजलेलीं असतात. अशा वस्तीत मृत्युसंख्येचे प्रमाण कधीं कधीं दुप्पट असतें. बालकांचे मृत्युसंख्येचें प्रमाण भयंकर असतें. घरांच्या ओळी, मागील बाजूनें एकमेकांस चिकटून असल्यानें हवा व उजेड आंत शिरत नाहीत. खोल्या अंधेऱ्या व घाणेरड्या असतात. अशा स्थळी एकंदर मृत्युसंख्या हवेशीर भागांतल्या घरांपेक्षां दिडीनें असते. क्षय, फुप्फुसाचे विकार, अतिसार, स्पर्शसंचारी रोग ह्यांपासून होणारें मृत्यु- संख्येचे प्रमाण शेकडा पन्नास असतें. गाड्यांच्या रहदारीच्या रस्त्यांची रुंदी ३६ फूट असावी. गाड्यांतून चालणाऱ्या रस्त्यांची रुंदी २४ फूट चालेल. प्रत्येक नवे घराचे पुढें निदान २४ फूट जागा असावी; व पिछाडीस कमीत कमी १५० स्क्वेअर फूट जागा असावी. मागल्या खुल्या जागेची रुंदी १० फुटांपेक्षां कमी