पान:आरोग्यशास्त्र.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातावरण व वाताभिसरण ६३ नसावी व इमारत १५ फुटांपेक्षां जास्त उंच असल्यास ती अधिक असावी. कारण इमारतीचे उंचीचे मानाने बाहेरील हवा. खेळण्याला प्रतिबंध होतो. धूर असलेले जागेंतील हवा अशुद्ध असते. त्या टिकाणीं अंधार होतो व तेथें राहणाऱ्या लोकांची प्रकृती क्षीण होते. धूर उत्पन्न होऊं नये म्हणून लाकडे ओली किंवा दमट वापरू नयेत. स्वयंपाकघरांतून धूर चर निघून जाण्यास वाट असावी; व त्या जागेत बाहेरील हवा पुष्कळ येईल अशी व्यवस्था ठेवावी. चुलीची व भट्टीची अशी व्यवस्था ठेवावी कीं ज्वलनाला पुरेशी हवा मिळावी. राहत्या गृहांत हवा खेळवणे गृहाचे वाताभिसरणाचे काम अमुक एक मर्यादेपर्यंत हवेंत दोष असला तर चालेल, त्याचेवर असतां कामा नये अशी सीमा आंखून ठेवावी लागते. खुल्या खडकाळ अगर कोरड्या मैदानांत मात्र आपणांला स्वच्छ निर्दोष हवा मिळते. तिच्यांतही दर हजारी ०.४ भाग कॅर्बानिक अॅसिड वायु असतो. कॅर्बानिक अॅसिडाची हवेंतील क्षम्य मर्यादा हजारौं एक असावी असें पेटेट कॉफरचें मत आहे. हाल्डेनचे मतें शाळांचे इमारतींत दिवसा ·०३ व रात्री १ भाग कॅर्बानिक असिड वायु क्षम्य समजावा. विलायतेतील होम ऑफिसने असें ठरवलें आहे कीं, कापडाचे कारखान्यांत ०.९ भागापेक्षां जास्त कर्बानिक वायु असतां उपयोगी नाहीं. प्रोफेसर चामंटनें शोधाअंतीं असें ठरविलें आहे की, हवेंत हजारों दोन भागांपेक्षां ज्यास्त कॅर्बानिक वायु असल्याशिवाय कुंद अथवा घाण वास समजून येत नाही. ही घाण प्राणिज पदार्थांपासून येते. दुर्गंधीचे मानाप्रमाणे त्या हवेंतील कॅर्बानिक वायूचें मान समजावें. जेव्हां ०३ भागांपर्यंत वायूचें प्रमाण वाढते तेव्हां घ्राणेंद्रियाला समजेइतको हवा मलिन होते.