पान:आरोग्यशास्त्र.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૬૪ आरोग्यशास्त्र स्नायूंचा व्यापार जोराने चालला असतां फुप्फुसाचे द्वारा अधिक कॅर्बानिक वायु सोडला जातो. गॅसचे दिव्याचे ज्वलनापासून उत्पन्न होणारे पदार्थ या ठिकाणीं अधिक असतात. म्हणून कारखान्यांतून व गिरण्यांतून खाजगीपेक्षां दुप्पट किंवा तिपट ताजी शुद्ध हवा सोडली पाहिजे. खोलीपैकीं खुली जागा दर माणशी किती देतां येते हें पाहावें लागतें. ती अधिक देतां आली तर बाहेरील हवा आंत कमी आणावी लागते. म्हणजे हवेचा झोत उत्पन्न होत नाहीं. हवेचा झोत प्रत्यक्ष अंगावर आल्यानें सर्दी इत्यादि रोग होतात. घराची स्वच्छता कायम राहाण्यास दर माणसी ४०० स्केअर फूट जागा लागते असा सामान्य नियम आहे. परंतु हें ठरवितांना पृष्ठभाग अधिक लांबरुंद असला पाहिजे. बारा फुटांपेक्षां अधिक उंचीचे जागे- तील हवेची शुद्धि बरोबर होत नाहीं. कारण उच्छ्रसनापासून बाहेर पडणारे सदोष पदार्थ जमिनीचे पृष्ठभागीं ज्यास्त असतात. म्हणून पृष्ठ- भाग विस्तृत असेल तर तो शुद्ध करणे सोपें जाईल. परंतु वाताभिसरण कमी असेल तर नुसता पृष्ठभाग विस्तृत असून उपयोग नाहीं. विलाय- तेंतील सार्वजनिक शाळांत बारा वर्षाचे दर विद्यार्थाला ७० ते ८० स्केअर फूट जागा ठेविली पाहिजे असा निर्बंध आहे. ७०० ते ८०० घनफूट हवा त्याचे वाटणीस येते. इंग्लंड देशांत खुली हवा उष्ण न करतां गृहांत सोडली तर सबंध दिव- सांत तीन वेळांपेक्षां अधिक वेळां गृहांतील हवा पालटतां येत नाहीं. ती अधिक वेळां पालटावी म्हणून दर वेळीं ज्यास्त हवा आंत येण्याजोगी तजवीज़ केल्यास वारा असह्य वेगानें आंत येईल. म्हणून दर माणशी १००० क्युबिक फुटांपेक्षां फारशी कमी जागा नसावी. सबंध दिवसांत दर माणशी ३०० घनफूट नवी हवा आणावी लागेल. तर इतकी हवा आणावयाची ती दर सेकंडास पांच फुटांपेक्षां अधिक न यावी म्हणून