पान:आरोग्यशास्त्र.pdf/७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

"६६ आरोग्यशास्त्र 'ठेवलें असतां तो वेगानें वाहात असेल तर त्याचें नियमन करण्यास त्रास पडतो. व तो अगदीं बंद असला तर घरांतील हवा कुंद राहील. दाट वस्तीतील इमारतींमध्ये हवा खेळण्यासाठी खालील प्रकारची व्यवस्था करितात. एक मोठी नळी घरापेक्षां उंच येईल अशी असते. तिचे मुखाला फिरवतां येईल असा कौल ( Cowl ) लावलेला असतो. वाह- -णारा वारा आंत येईल असें त्याचें तोंड फिरतें. कौलाचे द्वारा वारा नळींत शिरतो. तेथून तो तळमजल्यापर्यंत पोहोचतो. ह्या ठिकाणचे मुख्य नळाला नळ्या जोडलेल्या असतात व तिच्या शाखा प्रत्येक खोलीला वाटल्या जातात. ह्या रीतीने घराचे प्रत्येक भागास शुद्ध हवा पोहोचते. घरांत उत्पन्न झालेली अशुद्ध हवा, वाऱ्याकडे पाठ केलेला कौल ज्या नळाला जोडलेला असतो त्याचे द्वारा बाहेर पडते. घरांत वाताभिसरण पुरेसें आहे किंवा नाहीं हें पाहतांना खालील बाबींकडे लक्ष द्यावें. प्रथम घरांतील एकंदर घनफूट जागा किती आहे ती मोजावी. सामान- सुमानानें व्यापलेली जागा त्यांत वजा घातली पाहिजे. माणसाचे शरी- राने व्यापलेल्या जागेबद्दल दर माणशी तीन घनफूट जागा वजा केली पाहिजे. त्या ठिकाणीं निजणारा व त्याचें अंथरूण ह्यांसाठी १० घनफूट जागा कमी करावी लागते. म्हणजे एकंदर प्रत्यक्ष खुल्या जागेचें माप होईल व किती जागेचें वाताभिसरण केलें पाहिजे हे समजेल. नंतर चारा आंत येण्याचीं व बाहेर सोडण्यासाठी केलेली द्वारें, खिडक्या इत्यादींची मापें घ्यावीं. हवा कोणचे दिशेने येते व जाते हैं समजण्यास 'बौन पेपरचा धूर चांगला दर्शक आहे. धुराचे दिशेवरून वारा कसा वाहात आहे हे समजेल. वाऱ्याची गति एरिऑमिटर नामक यंत्रानें मोजावी. वारा दर सेकंदाला चिमणीचे अमक्या गतीनें वाहातो हैं सम- "जल्यावर अमुक आकाराचे द्वारांतून हवा किती आंत येते हें दोहोंचा