पान:आरोग्यशास्त्र.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वातावरण व वाताभिसरण गुणाकार केल्यानें समजेल. वाऱ्याची गति दर सेकंदास ७ फूट आहे असें धरलें तर ७ फूट सेक्शनल एरिया असणाऱ्या द्वारातून ४९ घन फूट हवा दर सेकंडाला घरांत येईल. एखाद्या इमारतीचें वाताभिसरण करण्याचे कामी खालील मुद्दे ध्यानांत ठेवावे. (१) हवा उष्ण झाली असतां वर चढते व शांत झाली तर खाली तळाला येते. ( २ ) थंड हवा खोलीत शिरते व ज्याप्रमाणें पाणी शिरलें असतां त्याला गति मिळेल तशी हिला मिळते व बाहेरल्या हवेचें उष्णमान आंतील उष्णमानापेक्षां कमी असेपर्यंत हा प्रकार होईल. ( ३ ) खुली शुद्ध हवा घरांत घेण्याला जें महत्त्व आहे त्यापेक्षां दूषित हवा बाहेर घालविणें ह्याला महत्त्व ज्यास्त आहे. ( ४ ) दर माणशी २४ रक्वेअर इंचांची हवा येण्यासाठीं खिड- कीची जागा आखून ठेवावी. (५) हवा बाहेर सोडण्याचीं द्वारे उंच छताकडे, आढ्याकडे असावीं. ( ६ ) आंत हवा घेण्याची द्वारे सखल असावीं. ( ७ ) दर माणशी २५० स्क्वेअर फुटांपेक्षां कमी जागा असल्यास कृत्रिम उपायांनीं वाताभिसरण केलें पाहिजे. हवेची परीक्षा ही परीक्षा ( १ ) घ्राणेंद्रियानें, (२) रासायनिक रीत्या, (३) सूक्ष्मदर्शकानें व ( ४ ) जंतूंसंबंधी अशी चार प्रकारांनी करतात. ( १ ) एकाद्या खोलीत शिरल्याबरोबर किती वास येतो हें लक्ष- पूर्वक पहावें. सल्फ्युरेटेड हैड्रोजन, कार्बन-डायसल्फैड, प्राणिज पदार्थ, कोल-गॅस इत्यादीचा वास नाकाला समजतो. ही स्थूल परीक्षा आहे.