पान:आरोग्यशास्त्र.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

૬૮ आरोग्यशास्त्र (२) रासायनिक परीक्षा- अशुद्ध हवेचा परिणाम प्राणवायूचे न्यून- तेंनें फारसा घडत नसून मुख्यतः कॅर्बानिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यानें होतो. म्हणून कॅर्बानिक अॅसिडची तपासणी आवश्यक आहे. अर्कोदकानें भरलेली व कांचेचें बूच असलेली मोठी बाटली घ्यावी. ज्या ठिकाणची हवा तपासणीसाठी घ्यावयाची असेल त्या जागीं त्या बाटलीतील पाणी ओतावें व ती बाटली वाळू द्यावी. नंतर त्या ठिकाणची हवा आंत घेऊन बाटलीला बूच लावावे. अशा बाटलीत ५० क्यू. से. स्वच्छ व ताजें बरायटा वॉटर घालावें व तसेंच बूच लावावें. ती बाटली कांहीं काळ तशी राहू द्यावी. मधून मधून तें पाणी हालवावें. हवेंतील कॅर्बानिक अॅसिडवायु मिसळून कार्बोनेट ऑफ बेरिअम हा पदार्थ बनतो व पाण्यांतील क्षारधर्म कमी होतो. म्हणून त्या पाण्यांतील प्रथम असणारें व मागाहून उरणारें क्षारधर्मांचे प्रमाण ह्यांतील जें अंतर त्यावरून कॅर्बानिक वायूचें मान समजतें. बराय - टाचे पाण्यांतील क्षारधर्माचें मान ऑक्जेलिक अॅसिडाचे स्टँडर्ड सोल्यू- शननें समजतें. ह्याचा १ क्यू. से. कॅर्बानिक वायूच्या ५ क्यू. से. बरोबर असतो. फेनॉलथैलिनचा उपयोग ह्या वायूचे परीक्षणांत होतो. तो निवर्य झाल्यानें रंग नाहींसा होतो. सेंद्रिय (ऑर्ग्यानिक) पदार्थोत्पन्न अशुद्धताः - पोटॅश परमँगॅनेटच्या मंद केलेल्या द्रावणांत हवा सोडावी. ह्याचा ००१ ग्रॅम रंगहीन होण्यास किती घनफूट हवा लागली हे पहावें. (३) सूक्ष्मदर्शकाची परीक्षा:- १०० क्यू. से. अर्कोदक भरलेल्या कांहीं बाटल्यांत हवा सोडावी. नंतर वरील पाणी काढून खालीं बस- लेला वनभाग सूक्ष्मदर्शकाखालीं तपासावा. (४) जंतूंसंबंधी परीक्षाः - लांब व शुद्ध केलेल्या परीक्षक नळी- मध्ये ५० क्यू. से. पातळ केलेलें जिलेटिन घालावें. सुकल्यावर त्यांत