पान:आरोग्यशास्त्र.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उजेड, व्यायाम व वस्त्रप्रावरण ६९. हवा खेळवावी, म्हणजे हवेंतील जंतु त्यावर बसतात. मग नळीचें तोंड शुद्ध कापसानें बंद करावें. ही नळी चोवीस घंटे निवाऱ्याचे व मध्यम उबेचे जागेत ठेऊन तपासण्यास घ्यावी. प्रकरण ४ थें उजेड, व्यायाम व वस्त्रप्रवरण " उजेड रात्रींचे समयीं कृत्रिम उजेड मनुष्याचे सुखाला व आरोग्याला अवश्य आहे व तो पुरेसा नसला तर नेत्राला अपाय होईल. पेट घेणाऱ्या पदार्थांच्या ज्योतीपासून उत्पन्न होणारा उजेड हा प्रचारांत आहे. हे पदार्थ हैड्रोकार्बननें ( हैड्रोजनवायु व कोळसा विशिष्ट पदार्थ ) घटित असतात. उजेड देतांना हे पदार्थ जळतात. विजेपासून उत्पन्न होणाऱ्या उजेडांत याहून भिन्न प्रकार असतो. तैलादिक पदार्थ जळ- तांना त्यांचे घटकांशांपैकीं कार्बन हवेंतील ऑक्सिजनशीं मिसळून अपायकारक कॅर्बानिक अॅसिड वायु उत्पन्न होतो व तैलांतील दुसरा घटक हैड्रोजन हा हवेंतील ऑक्सिजनशीं संयोग पावून पाण्याची वाफ बनते. विजेचे उजेडापासून कॅर्बानिक वायु उत्पन्न होत नाहीं व हवेंतील ऑक्सिजन कमी होत नाहीं. धुराचे ( कोलगॅसचे ) दिवे मेणबत्तीचे दिव्यांपेक्षां चांगले. मेणबत्तीचे ज्योतींत चढउतार व हलण्याची क्रिया असते त्यामुळे डोळ्यांना अपाय घडतो. आल्बा कार्बन नामक दिव्यांत नॅफथॅलिनची वाफ कोलगॅसमध्यें जळते. ह्या दिव्याचा दिपवून सोडणारा पांढरा प्रकाश पडतो.