पान:आरोग्यशास्त्र.pdf/७८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७० आरोग्यशास्त्र ॲसेटौलेन नामक वायूपासून मोठा पांढरा प्रकाश पडतो. कार्बाइड ऑफ कॅल्शिअमची क्रिया पाण्यावर घडल्याने हा उत्पन्न होतो. पेट्रोलियम तेलें - अशुद्ध पेट्रोलियमपासून शोधन क्रियेनें दिव्यांत जळण्याजोगें तेल काढतात. ह्याला केरोसीन म्हणतात. ह्या तेलाला दुर्गंध येतो. पेट्रोलैट लॅप - ह्याचा प्रकाश मोठा पडतो. ह्यानें अपाय किंवा अपघात घडत नाहींत. ह्या दिव्यांत फार शोषक धर्माचा दगड पेट्रोल शोषून घेतो व पेट्रोलची वाफ पुष्कळ हवेंत मिसळल्याने मोठ्या उष्णमानाची ज्योत होते. ह्या ज्योतीचा आघात मँटलवर पडल्यानें दैदीप्यमान उजेड पडतो. किटसन् लाइट —- रस्त्यांचे दिवाबत्तीचे कामीं ह्याचा उपयोग होतो. ह्याचे प्रकाशाची उत्पत्ति खालील प्रकाराने होते. पेट्रोलियम तेलाची वाफ होते. ह्या तेलाची हवा मिसळण्यांत येते व ह्याची ज्योत विशिष्ट प्रकारच्या मँटलवरून घासन जाईल अशी व्यवस्था केलेली असते. ह्याचा उजेड अति लांबवर पसरतो. हा विजेच्या व धुराच्या दिव्यापेक्षा स्वस्त असतो. व्यायाम शरीर निरोगी व सुदृढ होण्यासाठी किंवा करमणुकीकरतां शारी- रिक श्रम करणें ह्यास व्यायाम ह्मणतात. व्यायामामुळे शरीरावर खाली लिहिल्याप्रमाणें परिणाम घडतात:- (१) हृदयाची क्रिया जोरानें व वेगाने चालते म्हणून शरीराचें सर्व भागांतून रुधिराभिसरण अधिक चालतें. ( २ ) फुप्फुसांतील अभि- सरण वेगानें चालण्यानें कॅबॉनिक अॅसिड वायु व वाफ ज्यास्त बाहेर पडते. फुप्फुसांत शिरणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या हवेचें प्रमाण वाढतें. (३) चर्माची क्रिया वाढते व धर्मोत्पत्ति अधिक होते. ( ४ ) मूत्रा