पान:आरोग्यशास्त्र.pdf/७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उजेड, व्यायाम व वस्त्रप्रावरण ७१ पैकीं द्रवांश व क्षार कमी होतात. कारण त्वचेमधून उत्सर्जित द्रव्य अधिक निघते. परंतु यूरिया, यूरिक अॅसिड व इतर नैट्रोजन विशिष्ट द्रव्यांचे उत्पत्तीचें प्रमाण कमी होत नाहीं. अतिव्यायामानंतर घेत- लेल्या विसाव्याचे अवधीत नैट्रोजनचे विसर्जन कांहीं अधिक होतें. ( ५ ) ऐच्छिक स्नायूंना चांगली मेहनत घडते. त्यांमधून रुधिराभिसरण जोराने चालते. निरुपयोगी व गलित द्रव्ये उत्सर्जनासाठी वेगानें लोटली जातात. म्हणून झिजून गेलेल्या कणांचे जागी नव्या द्रव्यांचा पुरवठा होतो. व्यायामापासून म्हणजे स्नायूंचे व्यापारांपासून रुधिरप्रवाह वेगानें होता. कॅर्बानिक अॅसिड वायूचें व पाण्याचे उत्सर्जन अधिक होतें. ह्या- पासून हें दृष्टांस पडतें कीं, तृषा व क्षुधा वाढते आणि पाणी व कार्बन- विशिष्ट पदार्थांची (नवी करण्याचे ) पाषणाचे काम जरूरी लागते. ऑक्सिजनची क्रिया नियमित करण्याने झालेला नैट्रोजनविशिष्ट द्रव्यांचा क्षय भरून काढण्यासाठी मेहेनतांचे वेळी किंवा मागून अधिक नैट्रोजन- विशिष्ट पदार्थ सेवन करावे लागतात. झिजून गेलेल्या भागाचें उत्सर्जन करण्यासाठी आंतड्याचे क्रियेस चेतना देण्यासाठी मानसिक श्रम करणाऱ्यांना खुल्या हवेंत नित्य व्यायाम घेणें ही आवश्यक गोष्ट आहे. शरीराच्या सर्व क्रिया व्यवस्थेनें चालण्यास शरीरांतील सर्व स्नायूंना व्यायाम मिळणें आवश्यक आहे. जोराच्या व चपलतेच्या कार्यांत सर्व स्नायु तयार व पुष्ट असले पाहि- जेत. विशिष्ट प्रकारचे व्यायामानें विशिष्ट प्रकारचं स्नायु कमावण्याची खटपट करूं नये. कारण त्यामुळे शरीराचे भिन्न भागांची मेळानें क्रिया घडत नाही व वहिवाटीत नसलेल्या दिशेने व सुलभ रीतीनें गति होत नाहीं. शक्ति व चपलता एकंदरीनें व सारवाक वाढावी अशाविषयों प्रयत्न ठेवावा व स्नायूंचे एकएकट्या समूहाचे बलावर विशेष प्रकारच्या