पान:आरोग्यशास्त्र.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७२ आरोग्यशास्त्र कसरती करण्याच्या खटपटीस लागूं नये. चालणे, धावणे, घोड्यावर बसणें, दांडपट्टा खेळणें, ठोसा ठोशी खेळणें, वल्हीं मारणें व ज्यांत हात, पाय, पाठ, पोट, मान इत्यादि शरीराचे बहुतेक भागांचे स्नायूंना पुष्कळ व्यायाम घडतो असे खेळ शारीरिक, मानसिक व नैतिक शिक्ष- णाचे कामी कृत्रिम व्यायामापेक्षां श्रेष्ठ आहेत. चढाओढीचे कामानें अंगीं धैर्य येतें, मनःसंयमनाची संवय लागते; क्रोध आवरतां येतो व शिस्त पाळण्याची संवय लागते; जिंकण्याची ईर्षा उत्पन्न होते, परंतु प्रतिपक्षाशीं न्यायानें व शांतपणाने वागणें व आपली प्रतिष्ठा दाखविण्या- पेक्षां आपल्या पक्षाचे सरशीकडे जास्त लक्ष देणें ह्या गोष्टी समजतात. व्यायाम झाल्यावर योग्य वेळानंतर अंगावरील घाम, स्नेहविशिष्ट पिंडांतील तेलकट पदार्थ व चर्माचे गळून गेलेले कण हे सर्व धुऊन काढण्यासाठीं साबण लावून चांगलें स्नान करावें. व्यायामाचा अतिरेक केल्यास हृदयाला ताण पडतो, झोंप लागते, छातींतील धडपड सुरू होते आणि नाडी संकोचित, बेगवान् व अ- नियमित होते. तालमीच्या ज्या व्यायामांत चेहरा काळसर होतो त्यामुळे शरीरावर अनिष्ट परिणाम होण्याचा संभव असतो. स्नायूंचे क्रियेपासून पैदा झालेल्या व सांठविलेल्या गल्ति कणांचे उत्सर्जन होण्यासाठी व प्राणवायूचा पुरवठा घेण्यास हृदयासकट सर्व स्नायूंना विसाव्याची आवश्यकता असते. व्यायामाचे वैचित्र्यामुळे कमी ज्यास्त वेळ विसावा घेतला पाहिजे. नाही तर स्नायु थकून जातील, त्यांचीं आकुंचनें मंद होऊन बंद पडतील. शरीर सक्रिय असतां हृदयाचे ठोक्यांमधील विरामामुळें तें ताजेतवानें होतें. भिन्न प्रकारचे निरीक्षणानंतर असें अनुमान निघतें कीं निरोगी मनु- याचे हातून दिवसांतून सरासरीने होणारे कामाचें मान ३०० टन वजन एक फूट उचलण्याइतकें असतें. इतकें काम बाहेर हमेशा