पान:आरोग्यशास्त्र.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उजेड, व्यायाम व वस्त्रप्रावरण ७३ सोसतें. त्यानें शरीराचें वजन घटत नाहीं व आसही वाढत नाही. १५० पौंड वजनाचे सामान्य प्रकृतीचे मनुष्याचें तो ताशी तीन मैलां- प्रमार्णे १७ मैल चालला ह्मणजे दिवसा सरासरी कामाचें माप ३०० टन होतें. व्यायामाची निवडः-ज्यांत शरीरांतील सर्व स्नायूंना व्यायाम घडतो व जो खुल्या मैदानांत करावयास सांपडतो आणि ज्यांत करमणूक होते तो उत्तम व्यायाम होय. व्यायामाची निवड करतांना ह्या तीन गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. इमारतींतील व उघड्या हवेंतील असे व्यायामाचे मुख्य दोन वर्ग आहेत. इमारतीतील घेण्याचे व्यायामांत मुख्यतः तालीम येते. खुल्या हवेंत घेण्याचे व्यायामांत आट्यापाट्या, खोखो, हुतुतु, लंगडी, इटि- दांडी, चेंडू लगोऱ्या, झोपाळ्यावर झोके घेणें इल्यादि देशी खेळ येतात. ह्याच वर्गात क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटन व हॉकी इत्यादि युरोपिअन पद्धतीचे खेळ येतात. ह्यांशिवाय पोहणें, वल्हीं मारणें, पायांनीं अथवा वाहनांवरून फिरणें इत्यादि अन्य तऱ्हेचे व्यायाम ह्या वर्गांत मोडतात. लाकडे तोडणें व खणणें ह्या कृत्यांतही चांगला व्यायाम घडतो. सपाटयानें चालून फिरावयास जाण्यानें मध्यम व्यायाम होतो. तालमीपैकी अनेक प्रकारचे व्यायामाने शरीराचे कोणचे भागाचे स्नायूं- वर विशेष कार्य होतें हें पाहूं. उठाबशीनें कमर व तिचे खालचे सर्व भागाला चांगला व्यायाम घडतो. चवड्यावर उभे राहून बैठकी काढल्याने पोठरीच्या स्नायूंना विशेष व्यायाम होतो. जोडी केल्याने खांद्यापासून बोटाचे शेवटापर्यंत सर्व भागांत व कार्खेत पुष्कळ व्यायाम होतो. जोर काढल्याने छाती, पाठ व दंड ह्यांचे स्नायूंना पुष्कळ व्यायाम होतो. कुस्तीचा व्यायाम चांगला. त्यामुळे शरीरांतील बहुतेक सर्व स्नायूंना व्यायाम घडतो. कुन्हाडीनें लाकूड फोडणें किंवा कुदळीनें जमीन खणणें