पान:आरोग्यशास्त्र.pdf/८२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७४ आरोग्यशास्त्र ह्यानें कमर, पोट, छाती व खांदा ह्यांचे स्नायूंना पुष्कळ व्यायाम मिळतो. साष्टांग नमस्कार घातल्याने किंवा पोहण्याने शरीराचे बहुतेक स्नायूंना बराच व्यायाम घडतो. आट्यापाट्या, खो खो वगैरे हिंदु खेळ व क्रिकेट, फुटबॉल वगैरे युरोपिअन पद्धतीचे खेळ ह्यांनी शरीराला मध्यम व्यायाम मिळतो. ज्याप्रमाणें शरीराचं चांगले पोषण होण्यास अन्नाची निवड केली पाहिजे, त्याप्रमाणें शरीर सुदृढ होण्यास व्यायामाची निवड करावी लागते. सर्व स्नायूंना कसरत, खुली हवा व मनोरंजन हीं तिन्ही ज्यांत असतील तो व्यायाम उत्तम होय. परंतु वरील विवेचनावरून असे दिसून येईल की, प्रत्येक प्रकारचे व्यायामांत कांहीतरी उणीव आहे. ताल- मांचा व्यायाम सर्वांत चांगला. कारण त्यानें शरीराचे प्रत्येक भागांतील स्नायु धष्टपुष्ट व सशक्त होतात. पण तो रिकाम्या मैदानांत होत नाही व त्यामुळे मनोरंजन घडत नाहीं. शिवाय त्यानें अंगांतील चप- लता काही कमी होते एकदां तालमीची खोड लागली ह्मणजे तालीम जन्मभर सुटत नाही. ती एकदम सोडल्यास अग्निमांद्य व शक्तिपात हों होतात. आट्यापाट्या, खो खो, क्रिकेट, फुटबॉल हे व्यायाम खुल्या हवेत होतात. त्यांनी मनरंजन होते. त्यांचे योगानें चपलता, शिस्त, मनःसंयमन, हातीं घेतलेले काम जरूरीने करण्याची संवय हे गुण अंगी येतात. परंतु स्नायु पुष्ट होत नाहीत म्हणून एकाच प्रकारचे व्यायामावर बसणें योग्य नाहीं. ज्यास उत्कृष्ट प्रकारची शरीरसंपत्ती पाहिजे त्यानें तालीम हो केलाच पाहिजे. परंतु तालमांचे व्यायामाला मर्यादा असते. तालमांचा व्यायाम वयाचे सुमारें चौदा वर्षापासून सुरू करून सुमारे पंचवीसापर्यंत करावा, व ब्रह्म- चर्य पुरते राखून कमाई करून घ्यावी. पंचविसावे वर्षानंतर तालीम हळू हळू कमा करांत जाऊन पस्तीसावे वर्षी पुरती बंद करावी. वयाचे