पान:आरोग्यशास्त्र.pdf/८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उजेड, व्यायाम व वस्त्रप्रावरण ७५ आठवे वर्षापासून व पुढें तालमीचा व्यायाम सुरू असतांना व तदनंतर सुमारें पासष्टावे वर्षापर्यंत आट्यापाट्या, क्रिकेट, टेनिस वगैरे उघड मैदानांतील खेळ शक्तिमानाप्रमाणे खेळावे. तालमीसारखा व्यायाम करणाराने तुपासारखे स्नेही पदार्थ अधिक खावे. दूध, भुईमूग, उडीद, हरभरा असले नैट्रोजनविशिष्ट पदार्थ ज्यास्त प्रमाणांत भक्षण करावे. तिखट थोडें खावें. असा क्रम ठेव- ल्यास शरीर पुष्ट होईल. अधिक व्यायाम करून चटणी भाकरी खाल्ल्यानें उपयोगापेक्षां अपाय ज्यास्त होतो. वस्त्रप्रावरण सुधारलेल्या समाजांत कापूस, ताग, रेशीम व लोकर यांचे कपडे.. वापरतात. कापसाचें कापड तुळतुळीत तलम असतें. हें टिकाऊ असतें. धुत- ल्यानें द्रवांश संकोचित होत नाहीं. हें द्रवांश सांठवून ठेवीत नाहीं व स्वतः वेगानें तें म्हणून शरीरालगतचा आंतला कपडा करण्याचे गैर-- उपयोगी आहे. घामानें हें स्वतः भिजतें व शरीर गारठतें. तागाचे काप- डांत तलमपणा व तुळतुळीतपणा अधिक असतो. कापसाचे कापडा- प्रमाणें त्याचे कपडे अंगालगत घालण्याचे काम इष्ट नाहींत. कापडाचे कामीं लोकर हा एक महत्त्वाचा पदार्थ आहे. सूक्ष्मदर्शकानें पाहतां लोकरीचे धाग्याचे मध्यभागी बहुधा बुजलेला असा मध्यवर्ति नळ असतो. लोकरीचे अंगीं उष्णतावाहक शक्ति अत्यंत कमी आहे. लोंकर जल आणि आर्द्रता सांठवून धरते. स्वतः भिजत नाहीं. ह्यामुळे अधो- वासनाचे काम उपयुक्त आहे. रेशमांत उष्णतावाहकता कमी आहे. तें अंतरीयाचे काम कांहीं बरें असतें. तें अधिक साफ राहतें, लोकरी -- इतकें आकसत नाहीं व त्वचेला मऊं लागतें. परंतु त्यांत लोकरीप्रमाणें घर्म सांठत नाहीं. हें महाग असतें व लोंकर व सुतापेक्षां कमी टिकतें