पान:आरोग्यशास्त्र.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७६ आरोग्यशास्त्र चर्भाचा उपयोग बर्फमय प्रदेशांत व विशेषतः ध्रुवाकडे फार होतो. अभेद्य असल्यामुळे तें फार उबदार असतें. परंतु याच धर्मामुळें अंत- - रीयाचे खाली असलेले हवेचे थर पालटून अंगालगतचें वातावरण होत नाहीं. उष्ण देशांत उत्तरीयें श्वेत वस्त्राचीं असावीत ह्मणजे प्रत्यक्ष उना- `पासून अपाय होत नाहीं. बाल्यावस्था व वार्धक्य ह्या आयुष्याच्या दोन्ही सीमांवर गरम व उब- -दार प्रावरणें अवश्य वापरली पाहिजेत. बालकाचे देहांतून उष्णतेचा निर्गम जलद होतो व त्यांना शैत्य होण्याचा अधिक संभव असतो. कारण रुधिराभिसरण वेगाने चालण्याने विवक्षित वेळांत त्वचेतून अधिक रक्ताचें अभिसरण होतें, म्हणून उष्णतेचा निर्गम ज्यास्त होतो. शिवाय शरीरांत असणाऱ्या इंद्रियांचे मानानें त्वचेचा विस्तार अधिक असतो. मुलांना लोकरीचे कपडे करावे. इतर भागांप्रमाणे पिंढऱ्या, पावलें, तळहात व मान ही देखील वस्त्राच्छादित असली पाहिजेत. वृद्धापकाळ अभिसरण बहुधा कमी व मंद असतें. उष्णतेच्या उत्पत्तीचे व व्यवस्थेचे व्यापार पूर्णतेने होत नाहींत. म्हणून शरीर गारठल्यावर पुन्हा ऊब लवकर येत नाहीं व जैवी ( Vital ) व्यापार ( शरीरांतील महत्त्वाचे व्यापार) मंदतेनें चालतात. लोंकर उष्णतावाहक नसल्यामुळे शरीराची उष्णता बाहेर पडूं देत नाहीं. लोकरीचे धाग्यांत तेलाचा अंश असल्यानें व त्याचे मोठे रंध्रांत हवा अधिक असल्यानें हा धर्म त्यांत असतो. मेहनतीनें आलेला घाम धाग्यामध्ये शोषला व सांठवला जातो. बाष्प घनरूप होते. ह्याप्रमाणें बाष्पीभवन होतांच नष्ट झालेली उष्णता शरीराला परत मिळते. म्हणून व्यायामानंतर देखील कपडा उबदार व कोरडा राहतो व शरीर गारठत