पान:आरोग्यशास्त्र.pdf/८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उजेड, व्यायाम व वस्त्रप्रावरण ७७ नाहीं. शरीरास थंडी लागून तें गारठलें तर अतिसार, अमांश, हिंव, गुजराथी इत्यादि विकार होतात. धुण्यानें लोंकर आकुंचन पावते व निकस होते. तिच्यांत शोषकता असल्यामुळे घाम व बाष्परूप पदार्थांनें ती लवकर घाण होते म्हणून दे कपडे कॉस्टिक पोटयाशम कमी व तेल ज्यास्त असेल अशा साबणानें धुवावे. कॉस्टिक सोडयानें लोंकर झडते व तिचा रंग पालटतो. फ्लॅनेल लोकरीची असते. तिच्यापासून नाजूक त्वचेच्या माणसाचे चर्माला कधीं कधीं अपाय घडतो. कपड्यांविषयीं सामान्य विचारः -- लोंकर, फर, रेशीम, कापूसत्र ताग हीं एकाहून एक कमी उबदार आहेत. कपडे ऋतूंचे मानाप्रमाणे व वयोमानाप्रमाणें वापरावेत. काळ्या रंगाचे कपडे पांढऱ्यापेक्षां अधिक उष्णता शोषून घेतात. काळा व काळसर पिवळा, फिक्कट, गवत्या व पांढरा हे रंग एकाहून एक कमी कमी उष्णता शोषणारे आहेत. कापडाचे सछिद्राचे मानानें त्यांत ऊब असते. छिद्रांमध्ये हवा असल्यानें उष्णतेचा निर्गम होत नाहीं. फ्लॅनेल अत्यंत सछिद्र व रेशीम सर्वांत कमी सछिद्र असतें. गुळगुळीत कापडापेक्षां खरखरीत कापड उबदार असतें, कारण त्यामुळे त्वचागत रुधिराभिसरणाला चेतना होते. क्लेद- शोषण धर्माचे मानानें कपड्याचे अंगीं ऊब असते, कारण ओलावा शोषला गेल्यामुळे शरीराची त्वचा गारठत नाहीं. तेथें बाष्पीभवन होत नाहीं, तें कपड्यांत होतें. शरीराच्या प्रत्येक भागाचें उष्णतामान सारखें रहावें अशी कप- 'ड्यांची व्यवस्था ठेवावी. ते सर्वांगभर असावेत. शरीराच्या स्वाभाविक क्रिया व चलन-बलन यांत कपड्यामुळे व्यत्यय येऊं नये व आच्छादित भागास त्याचेपासून अपाय घडूं नये. शिरोवस्त्र हलकें व सछिद्र असावें; त्याची कोर मस्तकाला रुपं नये म्हणजे रुधिराभिसरणाला व्यत्यय येत