पान:आरोग्यशास्त्र.pdf/८६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ आरोग्यशास्त्र नाहीं व टक्कल पडण्याचें एक कारण दूर होतें. कपडे ढिले असावेत, अवळ नसावेत. ऋतुमानाप्रमाणें व हवामानाप्रमाणें भिन्न प्रकारचे कपडे चापरावे. एकच जाड कपडा घालण्यापेक्षां तितक्याच वजनाचे दोन कपडे घातल्यानें ऊब अधिक येते. प्रकरण ५ वें भूजाति ( जमीन ) व वास्तुभूमि (सॉइल्स अँड बिल्डिंग सैट्स् ) ज्या जमिनीवर घरे बांधण्यांत येतात त्या जमिनीचे स्वरूपानुरूप क्ष्या स्थानांतील वस्तीचें आरोग्य असतें. गांवठाण्याची जमीन रोगट असली तर त्यावर बांधलेली घरें आरोग्यदायक राहणार नाहीत. वाळू व लहान खडीच्या जमिनी फार कोरड्या असल्यामुळे अत्यंत निरोगी असतात असा समज आहे. परंतु या सच्छिद्र असल्यामुळे मैलापाण्याने व शौचकुपाचे पाण्यामुळे त्या सहज सदोष होतात. सच्छिद्र जमिनींत पुष्कळ हवा व द्रवांश राहतो. खडकांत देखील कांहीं शोषक धर्म असतो; पण तो फार कमी असतो. या दोहोंचे दरम्यान पुष्कळ दर्जादर्जाच्या जमिनी असतात. प्रत्येक वस्तु सच्छिद्र असते. अशा प्रकारें असणाऱ्या पोकळ भागांत व विशेषतः जमिनींत सर्वगामी वायु असतो व कमी जास्त खोलीवर भौमजल ( ground water ) असतें. जेव्हां छिद्रांमध्ये हवा व ओलावा असतो तेव्हां त्या जलांशाला भौमाता म्हणतात. जेव्हां जमिनीमध्ये हवा नसून फक्त पाणीच लागतें तेव्हां आपल्याला भौमजल लागलें असें समजावें. ह्या