पान:आरोग्यशास्त्र.pdf/८७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भूजाति व वास्तुभूमि ७९ भौमजलाची उत्पत्ति पर्जन्यापासून होते. जमिनीवर पडणारा पाऊस झिरपून जमिनीत जातो व तें जल खालीं जात जात एकादे खडका - पर्यंत जाऊन पोहोचतें. तेव्हां त्याला अधिक खोल जाण्याला वाव न मिळाल्यामुळे तें त्यावर सांठून राहतें. ह्या भौमजलाचे सपाटीचे वरील भागांत जमिनीच। सच्छिद्र भाग हवेर्ने व्यापलेला असतो. ग्रीष्म ऋतूंत ह्या भौमजलाची सपाटी खाली जाते व पावसाळ्यांत वर येते. भौमजलाची ही सपाटी उंच नीच झाल्यानें तिचे वरील हवेस गति प्राप्त होते. घरांतील उष्णतेमुळे व अग्नीचे शोषक शक्तीमुळे तळच्या जमिनीखालची पुष्कळ हवा वर शोषली जाते. मात्र जमिनी सिमेंट व आस्फाल्ट घालून केल्या असल्यास हे शोषण फार कमी होते. जमिनीचे रंध्रांतील हवा दमट व अशुद्ध असते. भौमजल खोल असेल त्या मानानें हा दमटपणा कमी असतो. परंतु पृथ्वीवरील बहु- तेक ठिकाणी जमिनीचा पृष्ठभाग दमट असतो. कारण केशाकर्षण- शोषणाने तळांतलें उदक वर ओढले जातें, व पृष्ठावरील आर्द्रतेचें बाष्पीभवन झाल्यामुळेही दमटपणा येतो. पावसाबरोबर पुष्कळ सेंद्रिय पदार्थ जमिनीत घुसतात व ते आंत सडतात. यामुळे तेथील हवा अशुद्ध असते. घर बांधतेवेळी जमिनी करताना खरीप, बिटकरे व केर- कचरा असलेली माती घालतात. अशा ठिकाणी हवा अशुद्ध असते व तिचा दुष्परिणाम तेथें राहणारावर होतो. दलदलीचे मुलखांतील जागा, शौचकूप व थडग्यालगतची जागा, रोगोत्पादक असतात. प्राणिज अथवा उद्भिज जातीचे सेंद्रिय पदार्थ पृथ्वीमध्ये सूक्ष्म जंतूंचे मुळे कुज- तात. तेथें असलें खाद्य असल्यामुळे हे जंतु वाढतात व सेंद्रिय पदार्थांचें पृथ:करण करून त्यांचे घटकांपासून कर्मानिक अॅसिडवायु, अमोनिया, पाणी इत्यादि स्वल्प घटनेचीं द्रव्ये सेंद्रिय पदार्थांचे घटकांपासून तयार करतात आणि दरवाळण्याचे व कोथभवनाचे क्रियेमुळे जमिनीचे गर्भातील