पान:आरोग्यशास्त्र.pdf/८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८० आरोग्यशास्त्र भागाची शुद्धि करून वनस्पतीस उपयोगी पडणारे असे वरील प्रकारचे पदार्थ या जंतूंपासून होतात. भूपृष्ठालगतचे भागांत वर लिहिल्याप्रमाणें शुद्धिकरणाचें व वनस्पतींना उपयोगी द्रव्यांचे उत्पत्तीचे काम मोठ्या प्रमाणावर व सर्वत्र सारखं सुखं असतें. ह्या रीतीनें हे सुक्ष्म जंतु सर्व जगभर आरोग्यास मदत करतात. स्वास्थ्य नांदावें म्हणून दमट, सर्द व दलदलीच्या जागा निचरून जाव्या ह्यासाठी मोऱ्या, नाले काढावेत. भौमजलाचे सपाटीत चढ उतार फार होऊ नये म्हणून खोल भागीं मोऱ्या ठेवाव्या. पाण्याची सपाटी वर येऊ लागते तेव्हां भूछिद्रांतील हवा वर लोटली जाते. शिवाय ओलावा वर आल्यानें हवा दमट होते. दमट जमिनींतील द्रवांशाचें बाष्पीभवन झाल्यानें हवेंत शीतता उत्पन्न होते. अशा ठिकाणी राह- णाऱ्या लोकांना संधिवात, पडसें, मज्जातंतुजन्य रोग, फुप्फुसविकार, क्षयरोग इत्यादि रोग होतात. सांथीच्या अतिसाराची व पीतज्वराची उत्पत्ति ह्याच कारणापासून होते. सर्द, दमट व दलदलीचे जमिनींत हिमज्वरोत्पादक असे मलेरियाचे जंतु उत्पन्न होतात. दमट जमिनींत कुजण्याची क्रिया जास्त चालते. सुक्या, कोरड्या जागेमध्यें वरील प्रका- रचे रोग होणार नाहींत. दमट जमिनीतील ओलावा भिंतींतून वर चढतो. ह्याकरितां भिंतींचा सुमारें एक हात उंचीचा थर दगडांचा असावा. मातीच्या जमिनी थंड असतात. त्यांचे अंगीं उष्णता वाहून घेण्याचे धर्म नसतात. त्या दमट असतात, परंतु हा दुर्गुण पाया उंच बांधल्यानें कमी करतां येतो. खडूची किंवा चुनखडीची जमीन बहुधा कोरडी असते. वाऱ्याच्या दिशेला असणाऱ्या खो-यांतील हवा अन्य दिशेला असणाऱ्या खोऱ्यांतील हवेपेक्षां अधिक कोरडी व निरोगी असते. थंड व समशीतोष्ण कटिबंधांत वाळू व कंकराची जमीन उष्णताग्राहक व कोरडी असल्यामुळे अत्यंत निरोगी असते. खालील प्रकारच्या जमिनी