पान:आरोग्यशास्त्र.pdf/८९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भुजाति व वास्तुभूमि ८१ एकाहून एक कमी कमी प्रतीच्या आहेत:- वाळूची, कंकराची, खडूची, खडकाळ (ग्रानेट, पिठी स्लेट, चुनखडी ), काळ्या मातीची व दरीतील. वाष्पोद्गमनाला प्रतिबंध केल्यामुळे झाडांचेपासून दमटपणा येतो, म्हणून फाजील झाडींतील जमीन घरे बांधण्यास मध्यम असते. 4 वरील वर्णनावरून असे दिसून येईल कीं घरासाठी कोरडी, खुलास, वाळू व कंकराची व उतरती जमीन चांगली. जागा ओली व दमट असल्यास घराखालून मोन्या, नाले, काढावे. साधे भाजलेले व सछिद्र खापरी नळ घालावे. त्यांचेवर वाळूचा थर घालावा. म्हणजे द्रवांश पाझरून या नळांत पडतो व त्या वाटे वाहून जातो. घराची जमीन लाकडी तक्तपोशीची करावी. स्नानगृहाची व सामान वगैरे ठेवण्याच्या जागा फरशा व सिमेंटनें कराव्या. साध्या जमिनी करून शेणाने सारवीत राहाणें हें 'आरोग्यनाशक कृत्य होय. शेणासारखा कुजका पदार्थ घाणतो व त्यामुळे घरांत केर होतो. ह्या स्थानीं सूक्ष्म जंतूंचा फैलाव व वसतिस्थान असतें. भिंतींच्या दर्जा चांगल्या चुन्याने कराव्या. ताजा भाजलेला चुना एक भाग व वाळू तीन भाग ह्या प्रमाणांत चुना करावा. वाईट चुन्यापासून भिंती सर्द होतात. घराभोवतालची जागा देखील सर्द नसावी. तिच्या पृष्ठभागाची जमीन घराचे आंतील जमिनी- प्रमाणे तयार करावी. ह्या कामी इंग्लंड देशांत म्युनिसिपालिटीकडून घराचे मालकांना सक्ति करण्यांत येते. घरांत पुष्कळ ताजी हवा येईल अशा दिशेला घराचें तोंड असावें. घरांतील प्रत्येक खोली सूर्यकिरण जाण्याजोगी असावी. जिन्यांत व माळ्यांत उजेड व हवाशीरपणा असावा. घरावर तुराट्या वगैरेंचें पांजरण असल्यास तें दमट होतें. घरावर पत्रा, मंगलोरी कौलें किंवा ग्लेज केलेलीं व नीट जुडतील अशीं कौलें किंवा स्लेटीचे दगड घालावे. भिंती भुसभुशीत विटांच्या नसाव्यात. ६