पान:आरोग्यशास्त्र.pdf/९०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८२ आरोग्यशास्त्र गावांतील रस्ते पायाशुद्ध असावेत. रस्त्यांचा व आरोग्याचा संबंध आहे. ते फक्त साफ ठेऊन भागत नाहीं. घराच्या पायाचे काम लिहि- लेल्या सूचना अंमलात आणाव्या, त्याचा पृष्ठभाग कठीण, चिवट व तुळतुळीत असावा. रस्ता अगदी सपाट असल्यास त्यावर पाणी ठरून राहतें व फार गोलबाह्य असल्यास रहदारीला अडचण पडते. गरीब लोकांचा बहुतेक काळ रस्त्यावर जातो व शहरांत तळमजल्यांत व रस्त्याचे लगतचे जागी राहणारांचा काळ कांहीं कमी पण त्याच स्थितींत जातो. रस्ते साफसूफ व पायाशुद्ध नसले तर तेथें उत्पन्न होणाऱ्या सूक्ष्म जंतूंचा परिणाम त्यांवर किंवा त्यांत वावरणाऱ्या लोकांवर होतो. ग्रीष्म ऋतूंत होणारा अतिसार ह्या कारणापासून होतो. रस्त्यांचा पृष्ठभाग मॅकॅडॅम, वाळू, फळ्या व अॅस्फॅल्ट घालून तयार करतात. मॅकॅडमनें रस्ता तयार केल्यास चिखल, माती व धूळ पैदा होतात. त्याची दुरुस्ती वरचेवर करावी लागते व तो रोज रोज झाडावा व ओला ठेवावा लागतो. वाळूचा रस्ता चांगला असतो. परंतु त्यावर गाड्यांचे चाकांचा आवाज निघतो. रस्त्यावर फळ्या बसवून देण्यांत अतिशय खर्च येतो. असल्या रस्त्यांवर रहदारीनें आवाज व धूळ होत नाहीं व साफ ठेवणें सुलभ जाते. ह्यांवर घसरडें होतें परंतु पडल्यास लागत नाहीं, परंतु त्यांत द्रवांश मुरतो व उन्हाळ्यांत कांहींसा दुर्गंध व वाफा निघतात. अॅस्फॅल्टची तक्तपोशी फार आरोग्य- रक्षक असते. कारण ती तुळतुळीत, छिद्ररहित व फार टिकाऊ असते; त्यांत जोड नसतात. पायदळ जाणाऱ्यांना व मोटारींना ह्यांपासून मनो- हर रस्ता होतो. रस्त्यांचा पृष्ठभाग बनवल्यानंतर तो टिकाऊ होण्यासाठीं डांबर किंवा डांबराचीं तेलें यांपासून तो चांगला आवळ व अभेद्य करतात. गरम डांबर रस्त्यावर ओतावें व लगेच त्यावर वाळू इ. हंतरावी.