पान:आरोग्यशास्त्र.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हवामान आणि हवामापन ८३ ऑईल - टारचा हात दोनदोन महिन्यांनी लावावा लागतो. पाणी शिंपड- ण्याचे गाड्यांतून हा लावतात. कॅल्शिअम क्लोरैडचें द्रावण रस्त्यावर लावल्यानें हवेंतील आर्द्रता शोषली जाते व रस्ता किंचित् दमट राहातो, म्हणून धुळीपासून उपद्रव होत नाहीं. प्रकरण ६ वें हवामान आणि हवामापन हवामान (क्लैमेट) प्राणी व वनस्पती ह्यांचे जीविताशीं संबंध असलेलें वातावरण, जल व हवेचें उष्णतामान इत्यादि बाबी मिळून एखाद्या प्रांताचें किंवा देशाचें हवामान बनतें. एकाद्या जागेचें हवामान खालील गोष्टींवर अवलंबून असतें. १. विषुववृत्तापासून अंतर; २. समुद्रसपाटीपासून उंची; ३. समुद्रापासून अंतर; ४. वाऱ्यांची दिशा; ५. जमिनीची घटना किंवा प्रकार; ६. पर्वत अथवा डोंगर यांचें सान्निध्य. 'वरील बाबतींशिवाय खालील गोष्टींचा परिणाम एकाद्या स्थळाच्या हवामानावर होतो. १. जमिनीची लागवड; २. दलदली, तळीं इत्यादि असणें; ३. जंगलाचें अस्तित्व अथवा अभाव;