पान:आरोग्यशास्त्र.pdf/९२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८४ आरोग्यशास्त्र ४. देशपरत्वें ऋतुमानाप्रमाणे रोग होतात. ह्यावरून हवामानाचा परिणाम आरोग्यावर होतो हें सिद्ध होतें. मानवजातीच्या भिन्न वंशांचे विशिष्ट भेद हवामानानें उत्पन्न होतात. काळासावळा, गोरा, पिवळा, असे शरीराचे भिन्न भिन्न वर्ण त्याने होतात. देशसात्म्य (Acclimatisation) देशसात्म्य म्हणजे विशिष्ट देशाच्या अनुरूप प्रकृति होणें किंवा एखाद्या देशाची हवा मानवणें. देशसात्म्य अल्प काळांत होत नाहीं. दूर देशांत एकाएकीं कायमचें वास्तव्य करण्यानें आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतो. दूर देशांत राहणारांनी दरवर्षी काही महिने मातृ- भूत घालवावे. संधिवात, दमा, कास ( खोकला ) ह्यांनी ग्रस्त लोकांना उष्ण हवेंत जाऊन राहण्यानें फायदा होतो. थंड हवेंत राह- ण्याने पचनाचे व क्षीणता आणाणारे रोग कमी होतात. मधुमेय, गंड- माळा, उपदंश व असले दुसरे रोग झालेले इसम भिन्न हवामानांत वसाहत करण्यास अयोग्य आहेत. भिन्न प्रकारच्या हवेंत पुष्कळ पिढ्या गेल्यावर प्रकृतीच्या रचनेंत फरक पडत पडत ( Acclimatisation ) देशसात्म्य होतें. भिन्न भिन्न परिस्थितीप्रमार्णे मनुष्याची प्रकृतिरचना बनत जाते. हें मानवजातीच्या इतिहासावरून सिद्ध होतें. परंतु पर- देशांत वास्तव्य करण्यासाठीं जाणाऱ्या लोकांना अमुक एक हवामान मानवेल किंवा नाहीं हें सांगण्यास त्यांच्या चालीरीति व संवयी ह्यांचाही विचार केला पाहिजे. मान, हवामानापैकी आरोग्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टींपैकी उष्णता- आर्द्रता व हवेचा दाब ह्यांचा मुख्यतः विचार केला पाहिजे. उष्णतामान – हवेचें उष्णतामान हा हवामानाचा पाया आहे. ह्यावरून हवामानाचें वर्गीकरण करतात. उष्णतेची उत्पत्ति सूर्यापासून होते. परंतु उन्हांतील अथवा उत्सर्जित उष्णता व सावलीतील हवेची